Sunday, September 15, 2024
Homeनगरगोगलगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या जखमी

गोगलगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्या जखमी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

तालुक्यातील गोगलगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार शेळ्या जखमी केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

केंद्राने महाराष्ट्राचा खिसा कापला; रोहित पवारांचा आरोप

गोगलगाव शिवारात हरिचंद्र सीताराम गोपाळे यांच्या वस्तीवर घराच्या मागच्या बाजूस असलेल्या शेळ्याच्या गोठ्यात बिबट्याने शेळ्यावर हल्ला केला. शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने हरिचंद्र गोपाळे व इतर सहकार्‍यांनी गोठ्याकडे धाव घेतली. आरडाओरड झाल्याने बिबट्या थोड्याच अंतरावर असलेल्या उसाच्या शेताच्या कडेला जाऊन बसला. हल्यात दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर गोपाळे वस्तीपासून जवळच असलेल्या चांगदेव नानासाहेब म्हस्के यांच्या वस्तीवर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चरत असलेल्या शेळ्यावर हल्ला केला.

सत्यजित तांबेंना अप्रत्यक्षपणे
भाजपात येण्याची खुली ऑफर

परीमंडल वनपाल देवीदास पातारे व वनरक्षक मुस्ताक शेख यांचेशी संपर्क साधला असता हा मादी बिबट असून तिच्या मागे दोन बछडे आहेत. अशा परिस्थितित पिंजरा लावला आणि चुकून पिले पिंजर्‍यात अडकली तर मादी बिबट अधिक हिंसक होऊ शकते. त्यामुळे यबाबद योग्य तो निर्णय आणि काळजी घेऊन बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल.

‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11.86 लाखांची फसवणूक

- Advertisment -

ताज्या बातम्या