Thursday, June 20, 2024
Homeनगरकृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्याचे दुकान फोडले

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्याचे दुकान फोडले

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

- Advertisement -

एका व्यापाऱ्याचे दुकान फोडून दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

नेवासामधील कृषी उत्पन्न बाजार समितीत ही घटना घडली आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बनावट मालाच्या गोडाऊनवर छापा; दोघांना अटक

याप्रकरणी व्यापारी देविदास सदाशिव साळुंके (वय ५९) यांनी नेवासा फाटा येथील नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार दिनांक ८ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती, नेवासा खुर्द येथील धान्य खरेदी-विक्रीचे दुकाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दुकानातील कपाट उचकुन सोन्या चांदीच्या दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ८५ ऐवज चोरून नेला.

शनिअमावस्या : मंदिरच बंद

याप्रकरणी साळुंके यांच्या फिर्यादीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.विजय ठाकूर हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या