Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : तंबूमधून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरीला

Crime News : तंबूमधून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरीला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदानावर लावलेल्या तंबूमधून एका कुटुंबाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 40 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही घटना मंगळवारी (22 जुलै) सकाळी 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास घडली. गुणा दामा महानवर (वय 27 रा. गिलांडे मळा, पाटस, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर तंबूमध्ये राहत असून ते मेंढपालचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी 10 ते 10:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने तंबूमध्ये प्रवेश केला.

YouTube video player

तंबूतून एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची पान, सोन्याची नथ, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, 25 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, 50 हजार रूपयांची रोकड असा एकुण एक लाख 40 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती महानवर यांनी कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून महानवर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष बनकर करीत आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...