Wednesday, January 7, 2026
HomeनगरCrime News: सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह विदेशी चलन लंपास

Crime News: सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह विदेशी चलन लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सावेडी उपनगरातील उन्नती अमित बँक कॉलनी येथे चोरट्यांनी घरफोडी करत 20 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 ग्रॅमचा चांदीचा छल्ला व परदेशी चलन 700 युरो लंपास केल्याची घटना 18 जुलैच्या सायंकाळपासून 19 जुलैच्या दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दिनानाथ संभाजी झपके (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. दिनानाथ हे आपल्या पत्नी असावरीसह रासणेनगर, सावेडी येथे वास्तव्यास आहेत. झपके हे खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून, त्यांची पत्नी अहमदनगर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा मुलगा ऋत्वीक सध्या इंग्लंडमध्ये नोकरीस आहे. झपके दांपत्य 18 जुलै रोजी नातेवाईकांकडे सोलापूर येथे गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी घरातील कामांसाठी मदत करणार्‍या अंजुम शेख हिला घराची चावी देऊन सूचना दिल्या होत्या.

YouTube video player

मात्र 19 जुलै रोजी दुपारी 2 वाजता अंजुमने फोन करून घराचा दरवाजा उघडा असून चोरी झाल्याची माहिती दिली. याची कल्पना मिळताच झपके यांनी त्यांच्या मित्रांमार्फत तातडीने घराची पाहणी करून पोलिसांना कळवले. रात्री 8 वाजता ते स्वतः घरी परत आल्यावर त्यांनी पाहिले की मुख्य दरवाजाचे कुलूप तुटवून बेडरूममधील कपाटांची उचकापाचक करण्यात आली होती. कपाटातील दागिने व 700 युरो विदेशी चलन गायब होते. दरम्यान, या प्रकरणी झपके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...