Wednesday, April 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUS-Israel and Iran War : युद्धामुळे सोने, चांदीचे दर वाढले; आजचा भाव...

US-Israel and Iran War : युद्धामुळे सोने, चांदीचे दर वाढले; आजचा भाव किती?

नवी दिल्ली | New Delhi

अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू (Death) झाला आहे. या हल्ल्यानंतर इराणने देखील दोन्ही देशांना चोख प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या प्रमुख लष्करी स्थळांना लक्ष केले आहे. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या हल्ल्याचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. कारण या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या-चांदीचे भाव चांगलेच कडाडले आहेत.

- Advertisement -

गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात ११ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल २५ हजार रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. २०२६ वर्षाच्या सुरुवातीला सोन्या-चांदीचे दर (Gold and Silver Prices Rate) वाढले होते. त्यानंतर काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता इराण-अमेरिका संघर्षाने पुन्हा एकदा सोन्या-चांदीचा बाजार भाव वाढला आहे.

दरम्यान, आज (रविवारी) जीएसटीसह (GST) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ७५ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर चांदीने ३ लाख ३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एकाच दिवसात झालेल्या या वाढीमुळे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्याने ही दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

सोने दोन लाखांच्या पार जाणार?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली, तर सोन्याचे भाव २ लाखांच्या पार जाऊ शकते.त्यामुळे ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना; MI...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा १९ वा हंगाम सध्या सुरू असून, स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाद फेरीची...