Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशGold Silver Price : ऐन सणासुदीच्या काळात सोनं-चांदी महागलं, 10 ग्रॅम किती...

Gold Silver Price : ऐन सणासुदीच्या काळात सोनं-चांदी महागलं, 10 ग्रॅम किती पैसे मोजावे लागतील?

मुंबई । Mumbai

जागतिक घडामोडी आणि अमेरिकन टॅरिफच्या प्रभावामुळे कमोडिटी बाजारात चढ-उतार सुरूच आहे. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतींनी उसळी घेतली असून, जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एक लाखाच्या पुढे गेला आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असून, ती 1 लाख 13 हजारांवर पोहोचली आहे.

- Advertisement -

जळगावात सोमवारी सोन्याच्या किंमतीत 700 रुपयांची वाढ नोंदवली गेली, तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली. आज जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 3 हजार 500 रुपये आणि चांदीचा भाव 1 लाख 16 हजार 300 रुपये प्रतिकिलो इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 0.5 टक्के आणि चांदीत 1 टक्के वाढ झाल्याने ही तेजी दिसून येत आहे.

YouTube video player

अमेरिकन टॅरिफच्या भीतीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींवर परिणाम झाला आहे. स्टकिस्टांनी अलीकडेच केलेल्या मोठ्या खरेदीमुळे सोमवारी सोन्याचे दर वाढले होते. आज टॅरिफच्या घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि मागणी वाढल्याने या किंमतींना आणखी बळ मिळाले आहे.

जळगाव सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 820 रुपयांची वाढ झाली असून, प्रतितोळा भाव 1 लाख 2 हजार 220 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ होऊन तो 93,700 रुपये प्रतितोळा झाला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 620 रुपयांनी वाढून 76,670 रुपये प्रतितोळा आहे.

मुंबई-पुण्यातील सोन्याचे दर

22 कॅरेट : 93,700 रुपये प्रतितोळा
24 कॅरेट : 1,02,220 रुपये प्रतितोळा
18 कॅरेट : 76,670 रुपये प्रतितोळा

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि टॅरिफच्या घडामोडींमुळे येत्या काळातही किंमतीत चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी खरेदीपूर्वी बाजारातील ताज्या किंमती तपासण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...