धुळे । प्रतिनिधी dhule
येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची नोकरानेच (servant) फसवणूक (Fraud) केली असून लॉकरमधील (Locker) सुवर्णमुद्रा, हिरे जडीत दागिने असा 21 लाखांचा मुद्देमालच त्याने लंपास केला. याप्रकरणी रोखपाल असलेल्या नोकरावर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवपूरातील नेहरू चौकातील दिनेश कॉम्पलेक्समध्ये असलेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र वसंतराव खानकरी (वय 68 रा.शारदा नगर, देवपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा फोन आला अन् सुटला रावेर कृऊबा सभापती पदाचा तिढापुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’चे नाव बदलू नये-जिल्हाधिकारी
पतसंस्था कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवलेली पतसंस्थेची जंगम मालमत्ता व तारण असलेली साडेसहा लाखांच्या 10 ग्रॅम वजनाचे 12 व प्रत्येकी 5 ग्रॅमचे दोन सुवर्णमुद्रा व 15 लाख 25 हजार 310 रूपये किंमतीच्या 35 ग्रॅमच्या दोन हिरे जडीत बांगड्या, 29.200 ग्रॅमचे चार हिरे जडीत नेकलेस, 68.300 ग्रॅमचा हिरे जडीत नेकलेस सेट, 53.800 ग्रॅमचा हिरे जडीत हारसेट कानातील झुमक्यांसह असे एकुण 289 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे पंतसंस्थेत रोखपाल म्हणून नोकरीस असलेला शालीग्राम सुभाष योगेश्वर (रा.श्रीकृष्ण मंदिराशेजारी, देवपूर) याने अपहार व फसवणूक करीत चोरून नेले. पुढील तपास पीएसआय इंदवे करीत आहेत.
शेतकऱ्यांना प्रतीएकर १० हजाराची मदत करा!