Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : लग्नकार्यासाठी नेलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने हडप

Crime News : लग्नकार्यासाठी नेलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने हडप

शेजारी राहणार्‍या महिलेकडून विश्वासघात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लग्नकार्यात घालण्यासाठी विश्वासाने नेलेले चार लाख 90 हजार रूपये किमतीचे सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने परत न करता, त्याचा अपहार केल्याचा प्रकार नागापूर परिसरातील पितळे कॉलनी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वनिता परसराम नवले (वय 33 रा. पितळे कॉलनी, नागापूर) यांनी रविवारी (24 मे) फिर्याद दिली आहे. अनिता गणेश नजन (हल्ली रा. गणेश पार्क, गणेश चौक, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. फिर्यादी वनिता नवले यांनी त्यांच्या घराशेजारी पूर्वी राहणारी अनिता नजन या ओळखीच्या महिलेवर विश्वास होता. तिने लग्नकार्यात घालण्यासाठी दागिने हवे असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले फुल आणि वेल, तसेच 5 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुसी असे सोन्याचे दागिने नेले होते.

हे दागिने घेतल्यानंतर अनिता नजन हिने ते परत न करता सोन्याचा अपहार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे. ही घटना 15 ते 22 मे दरम्यान घडली आहे. पोलीस अंमलदार गणेश चौधरी अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : “दराडे निष्क्रिय, आठ दिवसांपासून प्रलोभने, भावाचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) रणधुमाळीत महायुतीमधील (Mahayuti) बंडखोरीचे नाट्य अधिकच रंजक आणि तीव्र झाले आहे. भाजपचे...