Monday, June 24, 2024
Homeनगरदरोडा घालणारे तिघे 24 तासात गजाआड

दरोडा घालणारे तिघे 24 तासात गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

स्वस्तात सोने देण्याचे आमिष (Lure of Cheap Gold) दाखवुन दरोडा (Robbery) घालणार्‍या टोळीस (Gang) अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अटक (Arrested) केली आहे. विजय जालिंदर चव्हाण (वय 26 रा. तांबेमळा, व्ही.आर.डी.ई. जवळ, ता. नगर), विजय गजाजन काळे (वय 26 रा. दहिगाव साकत, ता. नगर) तसेच महिला पाणकोर जालिंदर चव्हाण (वय 42 रा. तांबेमळा, व्ही.आर.डी.ई. जवळ, ता. नगर) अशी अटक (Arrested) केलेल्यांची नावे आहेत.

बळीराजावरील संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे!

भरत बबन नरवडे व उमेश रामकिसन ढवळे (रा. धनगरपिंप्री ता. अंबड, जि. जालना) यांना स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने (Lure) चाकूचा धाक दाखवून रविवारी (दि. 27) सकाळी नगर-दौंड रस्त्यावरील (Nagar Daund Road) अरणगाव (ता. नगर) शिवारात रेल्वे ट्रॅक जवळ लुटल होते. रोख रक्कम, सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असा 60 हजार 400 रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी नरवडे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून दरोडा (Robbery), फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता.

पाणलोटात पाऊस, मात्र लाभक्षेत्र कोरडे

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार बबन मखरे, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवींद्र कर्डिले, मेघराज कोल्हे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संतोष लोढे, विशाल दळवी, सोनाली साठे, रवींद्र घुंगासे, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळु खेडकर, अमृत आढाव, अरूण मोरे यांचे पथक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी काम करत होते. या पथकाने 24 तासात गुन्ह्याचा छडा लावून तिघांना अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने (Gold Jewelry), रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एक लाख 65 हजार 530 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांनी साथीदार दगु बडोद भोसले (रा. पडेगाव, ता. कोपरगाव हल्ली रा. वाळकी, ता. नगर), मितवान ज्ञानदेव चव्हाण (रा. बुरूडगाव, ता. नगर), अजय गजानन काळे (रा. दहिगाव ता. नगर) यांच्यासह गुन्हा केल्याची कबूली दिली आहे.

वांबोरी उपबाजारात कांद्याचे भाव स्थिरगावकरी येताच चोरटे पिकअप सोडून पळाले

- Advertisment -

ताज्या बातम्या