Saturday, November 9, 2024
Homeदेश विदेशGold Rate : सोन्याच्या भावात घसरण

Gold Rate : सोन्याच्या भावात घसरण

मुंबई | Mumbai

सोन्याच्या भावात आज परत एकदा घसरण पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेट सोने प्रति १० ग्राम जवळपास ५० रुपये स्वस्त आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारही याकडे आकर्षित झाले आहे.

- Advertisement -

एमसीएक्सवर सकाळी डिसेंबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ३९ रुपयांची किरकोळ घट होऊन प्रती १० ग्रॅम ४८,४७८ रुपयांवर ट्रेंड करत होता. या शिवाय पाच फेब्रुवारी २०२१वायदा सोन्याचा भाव यावेळी ४७ रुपयांच्या वाढीसह ४८.४७१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. या शिवाय जागतिक स्तरावर सोन्याचा हाजीर भावात घट पाहायला मिळाली.

दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी त्यांच्या किंमतीत किरकोळ घट दिसली आहे. एमसीएक्सवर सकाळी डिसेंबर २०२० च्या चांदीचा भाव सकाळी ०.४०टक्क्यांच्या म्हणजे २३९ रुपयांच्या घटीसह ५९६३४ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. या शिवाय पाच माच २०२१च्या वायदा चांदीची किंमत यावेळी ०.४९ टक्के म्हणजे ३०३ रुपयांच्या घटीसह ६१३२० रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत आहे. या शिवाय जागतिक स्तरावर चांदीचा वायदा आणि हाजीर भावात घट पाहायला मिळाली.

सोने सहा महिन्यांतील सर्वात कमी दरांवर करोना व्हायरसवरील लसीच्या विविध बातम्यांचे थेट परिणाम हे सोनं- चांदीच्या दरावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवाती काळात लसीमध्ये यश मिळत असल्यामुळे सोन्याकडे काहीसा ओघ कमी आहे आणि ग्लोबल इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूकही वाढली आहे. तसेच अमेरिकेतील राजकीय अस्थिरताही संपली आहे. ग्लोबल ग्रोथमध्ये रिकव्हरीच्या आशा वाढल्यामुळे सोन्याच्या दरांवरील भार वाढला आहे. मागील ६ महिन्यांचा आढावा घेतल्यास नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर सर्वाधिक कमी झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या