Tuesday, January 13, 2026
Homeदेश विदेशGold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या, तुमच्या शहरातील...

Gold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचे दर

दिल्ली । Delhi

जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. सोन्या-चांदीच्या दरातील वाढ थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी या दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुधवारी पुन्हा एकदा किमतीत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

- Advertisement -

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा (१० ग्रॅम) ३८० रुपयांची वाढ झाली आहे. ‘गुड रिटर्न्स’ने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव १,४२,५३० रुपये इतका झाला आहे. जर तुम्ही १० तोळे सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला तब्बल १४,२५,३०० रुपये मोजावे लागतील, कारण १० तोळ्यांच्या दरात एकाच दिवसात ३,८०० रुपयांची वाढ झाली आहे.

YouTube video player

केवळ शुद्ध सोन्याच्याच नाही, तर दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ दिसून आली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ३५० रुपयांनी वधारला असून, आजचा दर १,३०,६५० रुपये इतका झाला आहे. १० तोळ्यांसाठी ग्राहकांना १३,०६,५०० रुपये खर्च करावे लागतील.

गुंतवणुकीसाठी किंवा हलक्या दागिन्यांसाठी पसंती दिल्या जाणाऱ्या १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही २९० रुपयांची वाढ झाली आहे. आज १८ कॅरेट १ तोळा सोन्याचा दर १,०६,९०० रुपये असून, १० तोळ्यांचा भाव १०,६९,००० रुपयांवर पोहोचला आहे. लग्नसराईच्या काळात होत असलेल्या या सततच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

सोन्यासोबतच चांदीनेही आज ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल ५,००० रुपयांची भरघोस वाढ झाली आहे. आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २,७५,००० रुपये मोजावे लागतील. किरकोळ बाजारात १ ग्रॅम चांदीचा दर ५ रुपयांनी वाढून २७५ रुपयांवर पोहोचला आहे. १० ग्रॅम चांदीसाठी आज २,७५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति तोळा)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर पाहिले असता, मुंबई, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये सोन्याचा भाव स्थिर असून येथे प्रति तोळा (१० ग्रॅम) सुमारे १४,२५३ रुपये मोजावे लागत आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये हा दर थोडा अधिक असून तिथे सोन्याचा भाव १४,२६८ रुपये इतका आहे. मात्र, दक्षिण भारतातील चेन्नईमध्ये सोन्याचे दर तुलनेने सर्वाधिक आहेत. चेन्नईत आज २४ कॅरेट सोन्यासाठी १४,३६८ रुपये मोजावे लागत आहेत, जे इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहेत.

चांदीच्या दरातही चेन्नई आघाडीवर

केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या दरातही चेन्नईने इतर शहरांना मागे टाकले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरू: या शहरांमध्ये १० ग्रॅम चांदीचा दर २,७५० रुपये इतका आहे. चेन्नई येथे १० ग्रॅम चांदीसाठी २,९२० रुपये मोजावे लागत आहेत. प्रति किलो चांदीचा विचार केल्यास चेन्नईमध्ये चांदीचे दर इतर शहरांच्या तुलनेत सुमारे १७,००० रुपयांनी जास्त असल्याचे दिसून येते.

(टीप: वरील दरांमध्ये स्थानिक कर आणि जीएसटीचा समावेश असू शकतो, त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक सराफाकडे दराची खातरजमा करणे आवश्यक आहे.)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : हवाल्याच्या संशयावरून शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरी छापा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाल्याने मोठी रक्कम आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस व निवडणूक यंत्रणेच्या भरारी पथकाने सोमवारी (12 जानेवारी) सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख...