Friday, September 20, 2024
Homeक्राईमसोन्याचे बिस्कीट देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

सोन्याचे बिस्कीट देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

कोतवाली पोलिसांकडून संशयित आरोपी गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सोन्याचे बिस्कीट असल्याची बतावणी करून महिलेकडील एक तोळ्याची सोन्याची चेन लंपास करणार्‍या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. संतोष मोहनराव चिंतामणी (रा. राजगुरूनगर पेठ, बीड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुमन केशव खोजे (रा. धनगर गल्ली, भिंगार) या माळीवाडा बस स्थानक रस्त्याने जात असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांना भेटला. तो त्यांना म्हणाला, ‘सोन्याचे बिस्कीट तुम्हाला देतो कोणाला काही सांगू नका; पण मला या बदल्यात तुमची सोन्याची चेन द्या व हे सोन्याचे बिस्कीट तुम्हाला राहू द्या’, असे सांगून पिवळ्यो धातुचा तुकडा देऊन खोजे यांची फसवणूक केली होती.

यासंदर्भात खोजे यांनी मंगळवारी (27 ऑगस्ट) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणावा अशा सूचना दिल्याने त्यांनी फिर्यादीकडे सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीच्या वर्णनाची माहिती करून घेतली. त्या वर्णनाचा संशयित चांदणी चौक येथे ताब्यात घेतला. त्याने त्याचे नाव संतोष मोहनराव चिंतामणी असे सांगितले व गुन्ह्याची कबुली देत एक तोळ्याची चेन काढून दिली. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता माळीवाडा येथून एका महिलेला पंतप्रधान योजनेचे पैसे काढून देतो असे सांगून तीच्या गळ्यातील मणी मंगळूुत्र काढून घेतले असल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक महेश शिंदे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, सलीम शेख, दशरथ थोरात, संभाजी कोतकर, अविनाश वाघचौरे, अभय कदम, अमोल गाढे, सतीश शिंदे, अतुल काजळे, वर्षा पंडित, मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंड्डू यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या