Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : सोने कारागिराला कामगारानेच लुटले

Crime News : सोने कारागिराला कामगारानेच लुटले

4.80 लाखांचे दागिने घेऊन पसार || गंजबाजारातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील गंजबाजार भागातील एका सोनार कारागिराला त्यांच्याकडे काम करणार्‍या कारागीरानेच लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. रमजान पॉलिश अँड कारागीर या दुकानातून तब्बल 4 लाख 80 हजार रूपयांचे सोन्याचे दागदागिने घेऊन कामगार पसार झाल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

- Advertisement -

रमजान सलाम पीयादा (वय 37, रा. धरती चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. रमजान यांचे गंजबाजार भागात रमजान पॉलिश अँड कारागीर नावाचे सोने पॉलिशिंगचे दुकान आहे. त्यांनी गेल्या महिनाभरापासून शेख अरमान अली (रा. कोमलासागर, हुगली, पश्चिम बंगाल) याला कारागीर म्हणून ठेवून घेतले होते. अरमान हा दुकानाजवळच भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. 15 ऑगस्ट रोजी सकाळी रमजान व अरमान दोघेही दुकानात कामाला हजर झाले होते. दुपारी साडेबारा वाजता रमजान नमाज पढण्यासाठी बाहेर गेले.

मात्र, अवघ्या 15 मिनिटांत परतल्यानंतर दुकानाचा दरवाजा उघडा, सोन्याचे दागिने ठेवलेला ड्रॉवर रिकामा आणि अरमान गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा मोबाईलही बंद असल्याने त्यांनी थेट त्याच्या राहत्या खोलीत धाव घेतली, मात्र तो तेथेही मिळून आला नाही. अरमानने दुकानातून प्रत्येकी 12 ग्रॅम वजनाचे 5 सोन्याचे नेकलेस, 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टी व काळ्या मण्यांचे गंठण, प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाच्या 4 जोड सोन्याच्या पळ्या, अशा प्रकारे एकूण 4.80 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन अरमान पसार झाला आहे. या घटनेची नोंद कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी संशयित आरोपी अरमान शेख याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...