Saturday, July 27, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात 3 बोकड ठार

बिबट्याच्या हल्ल्यात 3 बोकड ठार

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी गोरख रंगनाथ फोपसे यांच्या घराजवळील गोठ्यातील 5 ते 6 शेळ्या व बोकड यांच्यावर बिबट्याने रात्री तीन वाजेच्या सुमारास हल्ला केला. यात 3 बोकड ठार झाले असून 2 शेळ्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळाल्यानंतर निमगाव खैरीचे पशुवैद्यकीय विभागाचे एस. एम. सानप व वन विभागाचे श्री. सानप, श्री. सुराशे यांनी शेळ्यांचा पंचनामा केला.

गोदापट्ट्यातील गोंडेगाव, मातुलठाण, नायगाव, जाफराबाद, निमगाव खैरी, नाऊर आदी गावांत अनेक दिवसांपासून बिबटे, हरिण व लांडगे या वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. याचा शेतकर्‍यांना मोठा उपद्रव होत आहे. यामुळे सोयाबीन, मका, कपाशी या पिकांचे नुकसान होत आहे.

अगोदरच पावसाअभावी शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. उशिरा पेरणी केली त्यातून कसेबसे पिके उगवलेली आहेत. या नैसर्गिक संकटांनी शेतकरी अडचणीत असताना या वन्य प्राण्यांकडून शेती पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे वनविभागाने या सर्व परिसरात वन्य प्राण्यांपासून नुकसान होत असलेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाईचे अर्ज भरून घ्यावेत, अशी मागणी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, संतोष कदम, प्रमोद मलिक, देविदास आढाव, राजेंद्र दिवटे, संजय लांडे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या