Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'असा' होणार वातावरणात बदल

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘असा’ होणार वातावरणात बदल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (farmers) विशेषता द्राक्ष उत्पादक (Grape grower) शेतकऱ्यांसाठी (farmers) तसेच रब्बी हंगामातील (rabbi season) पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात सोमवार (दि. 30) पासून वातावरणात बदल होणार असून आकाश निरभ्र राहणार आहे.

- Advertisement -

बुधवार दि.१ फेब्रुवारीनंतर हळूहळू किमान तापमानात (Minimum temperature) घसरण होऊन काहीशी हळूहळू थंडीत (cold) वाढ होईल, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Retired Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे. राज्यात कोकण (Konkan) व विदर्भ (Vidarbha) वगळता मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ७ अश्या एकूण १७ जिल्ह्यात पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणसह (Cloudy weather) तुरळक ठिकाणी विशेषतः दि. २८-२९ ला विजांचा कडकडाट व गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये (Grape grower) चिंतेचे वातावरण होते शिवाय या वातावरणाचा रब्बी हंगामाला हे फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती.अशा वातावरणामुळे दरम्यानच्या काळात थंडीचा प्रभावही काहीसा कमी झाला होता.

मात्र, आता महाराष्ट्रात सोमवार दि. ३० पासून आकाश निरभ्र होईल. दोन्हीही तापमानात विशेष बदल नाही. बुधवार दि.१ फेब्रुवारीनंतर हळूहळू किमान तापमानात घसरण होऊन थंडीत काहीशी हळूहळू वाढ होईल,असेही खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या