Friday, November 22, 2024
Homeजळगावचांगली बातमी : जळगावात 19 जूनपासून सुरू होणार पोलीस भरती

चांगली बातमी : जळगावात 19 जूनपासून सुरू होणार पोलीस भरती

जळगाव – प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलातर्फे 137 जागांसाठी जळगाव शहरात दि.19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या प्रक्रियेसाठी पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली असून यासाठी 6 हजाराच्यावर उमेदसारांची नोंदणी झालेली असून पात्र उमेदवारांची पोलीस भरती चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.महेश्वर रेड्डी पुढे म्हणाले की, जिल्हा पोलीस दल पोलीस ग्राउंडवर पोलीस भरती प्रक्रिया घेणार आहे. दि.19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार असून पहिल्या दिवशी 500 तर दुसर्‍या दिवशीपासून 1 हजार मुलांची परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक संबंधितांना देण्यात आले असून उमेदवारांना मोबाईलवर कळविण्यात आले आहे. त्यांना ऑनलाईन प्रवेशपत्रदेखील देण्यात आले आहे.

- Advertisement -

भरतीच्या दिवशी दि.19 जूनला पहाटे 4.30 वाजता उमेदवारांना प्रवेश देऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जायचे आहे. नंतर धावण्याच्या स्पर्धा व गोळाफेक घेऊन त्यांची पात्रता तपासली जाणार आहे. भरती प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी 6 हजार 557 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. या प्रक्रियेसाठी 350 कॉन्स्टेबल, 15 पोलीस उपनिरीक्षक, 10 निरीक्षक, 5 उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक व दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक आदींची टीम कार्यरत राहणार आहे, असे सांगून पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असून कोणीही चुकीच्या माहिती देणार्‍या अथवा एजंटांना संपर्क करू नये. किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी केलेे आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या