Thursday, May 15, 2025
Homeजळगावअमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली ; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक विस्कळीत

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली ; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक विस्कळीत

जळगाव – jalgaon
अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ (Railway station) आज दि.१५ रोजी दुपारच्या सुमारास मालगाडीचे डबे रूळावरून घसरल्याने अपघात (Accident) घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ मात्र नक्कीच टळला आहे.

- Advertisement -

हा अपघात घडल्याने सुरत-भुसावळ रेल्वे (Surat-Bhusaval Railway) वाहतुक विस्कळीत झाली आहे. ही घटना घडली तेव्हा समोरुन दुसरी रेल्वे गाडी आली असती तर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण या अपघातात आजूबाजूच्या रेल्वे रुळाचं देखील नुकसान झालं आहे.

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला मालगाडी निघाली होती. या दरम्यान अमळनेर स्थानकाजवळ मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. अपघातात सुदैवाने लोको पायलट आणि गार्ड सुरक्षितपणे बचावले आहेत. संबंधित घटना ही आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : मुंबई इंडियन्ससह ‘या’ संघांना मोठा धक्का; आयपीएलच्या उर्वरित...

0
मुंबई | Mumbai  आयपीएल २०२५ (IPL 2025) क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. स्पर्धेमध्ये ५७ सामने पूर्ण झाले असून, भारत पाकिस्तान (India vs...