Tuesday, June 16, 2026
Homeजळगावअमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली ; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक विस्कळीत

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली ; सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक विस्कळीत

जळगाव – jalgaon
अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ (Railway station) आज दि.१५ रोजी दुपारच्या सुमारास मालगाडीचे डबे रूळावरून घसरल्याने अपघात (Accident) घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ मात्र नक्कीच टळला आहे.

हा अपघात घडल्याने सुरत-भुसावळ रेल्वे (Surat-Bhusaval Railway) वाहतुक विस्कळीत झाली आहे. ही घटना घडली तेव्हा समोरुन दुसरी रेल्वे गाडी आली असती तर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण या अपघातात आजूबाजूच्या रेल्वे रुळाचं देखील नुकसान झालं आहे.

- Advertisement -

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला मालगाडी निघाली होती. या दरम्यान अमळनेर स्थानकाजवळ मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. अपघातात सुदैवाने लोको पायलट आणि गार्ड सुरक्षितपणे बचावले आहेत. संबंधित घटना ही आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...