Thursday, March 13, 2025
HomeराजकीयAssembly Election 2024 : भाजपला बंडखोरी रोखण्यात यश, गोपाळ शेट्टींची बोरिवलीमधून माघार!

Assembly Election 2024 : भाजपला बंडखोरी रोखण्यात यश, गोपाळ शेट्टींची बोरिवलीमधून माघार!

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकासाआघाडीतील नेत्यांपुढे बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश आले आहे.

- Advertisement -

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी गोपाळ शेट्टींची समजूत काढली. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पियुष गोयल यांच्यासाठी पत्ता कट झालेल्या गोपाळ शेट्टी यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द त्यावेळीही देण्यात आला होता. परंतु विधानसभेला तिकीट मिळण्याच्या आशेवर असलेल्या शेट्टींना भाजपच्या तिसऱ्या यादीत धक्का बसला, जेव्हा विद्यमान आमदार सुनील राणेंचं बोरीवलीतून तिकीट कापलं गेलंच, पण मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...