Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशगोरखपुरच्या गीता प्रेसला मिळाला 'हा' भारतातील मानाचा पुरस्कार

गोरखपुरच्या गीता प्रेसला मिळाला ‘हा’ भारतातील मानाचा पुरस्कार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘गांधी शांतता पुरस्कार’ यंदा उत्तर प्रदेशातील गीता प्रेसला (Geeta Press Gorakhpur) देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. “गीता प्रेसने गेल्या १०० वर्षांत लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केल्याने गीता प्रेसला हा पुरस्कार घोषीत झाला आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्यावतीने या पुरस्कारासाठी गीता प्रेसची निवड करण्यात आली आहे, असे सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला २०२१ या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार (Gandhi Shanti Puraskar) देण्यात येणार आहे. गीता प्रेस, गोरखपूरला २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अभिनंदन केले.

धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या ३ चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये सापडले, नेमकं काय घडलं?

महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्यानिमित्ताने १९९५ पासून केंद्र सरकारच्या वतीने गांधी शांतता पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे की हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ किंवा लिंग विचारात न घेता दिला जातो. महात्मा गांधी यांच्‍या आदर्शांवर चालणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. एक कोटी रुपये, मानपत्र आणि हस्तकलेपासून तयार करण्यात आलेली वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरम्यान, गीता प्रेस १९२३ मध्ये सुरू करण्यात आली आणि जगातील जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थांपैकी एक. प्रेसने १४ भाषांमध्ये ४१७ दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहे. यामध्ये सर्वाधिक साडेसोळा कोटी श्रीमद्भभगवद्गीतेच्या प्रतींचा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या