Thursday, May 1, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर, 'हा' विभाग आहे राज्यात...

Maharashtra News : सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर, ‘हा’ विभाग आहे राज्यात अव्वल !

मुंबई | Mumbai 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे (Office Improvement Program) भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन (Evaluation) करण्यात आले. भाजपचे तीन विभाग टॉप पाचमध्ये आहेत. पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या मंत्री आदिती तटकरेंचा (Aditi Tatkare) महिला व बालविकास खातं आघाडीवर आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसर्‍या क्रमांकावर आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावरती दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोशल मिडिया पोस्ट-

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचे नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टच्या माध्यमातुन म्हटले आहे.

असे आहेत विभाग –
– 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
– 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
– 5 जिल्हाधिकारी,
– 5 पोलिस अधीक्षक,
– 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
– 4 महापालिका आयुक्त,
– 3 पोलिस आयुक्त,
– 2 विभागीय आयुक्त आणि
– 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक

या सर्व अधिकार्‍यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.

सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर
आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग (Women and Child Development Department) सर्वोत्तम आहे. आदिती तटकरेंच्या खात्याला 80 टक्के गुण मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department) 77.95 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहे, माणिकराव कोकाटेंच्या (Manikrao Kokate) कृषी विभाग 66.15 टक्के गुण मिळाले आहेत. ग्रामविकास विभाग (Rural Development Department) चौथ्या तर परिवहन व बंदरे विभाग पाचव्या स्थानी आहे.

सरकारच्या 100 दिवसांत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम
चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना 100 पैकी 84.29 टक्के गुण
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14 टक्के गुणांसह द्वितीय
जळगावचे जिल्हाधिकारी 80.86 टक्के गुणांसह तृतीय स्थानी
अकोल्याच्या जिल्हाधिकार्‍यांना चौथ्या क्रमांकाचे 78.86 टक्के गुण
नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर आहे त्यांना 66.86 टक्के गुण

पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम
100 दिवसांच्या कामांत पालघर पो.अधीक्षकांना 90.29% गुण
नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पो.अधीक्षक द्वितीय स्थानी
नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीच्या पो.अधीक्षकांना 80 टक्के गुण
जळगावचे पो.अधीक्षक 65.71 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक 64 टक्के गुणांसह पाचवे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waves Summit 2025 : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

0
मनोरंजन व्यवसायात योगदान देणार्‍या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणार्‍या वेव्हज शिखर परिषद आणि...