Monday, May 27, 2024
Homeनाशिकविकासाचे चक्र लाल फितीमध्ये अडकून गेले - दिघावकर

विकासाचे चक्र लाल फितीमध्ये अडकून गेले – दिघावकर

नाशिक | प्रतिनिधी

देशाच्या विकासाचे चक्र लाल फितीमध्ये अडकून गेले आहे, नियोजनकर्त्यांनी देशातील उपलब्ध संसाधनांचा आणि उपलब्ध मनुष्यबळाचा यापूर्वी अजिबात विचार केला नाही त्यामुळे असंख्य तरुणांच्या हातात काम नाही, पुरेशी रोजगार निर्मिती झाली नाही. एवढे खरे आहे की, शासन सर्वांनाच शासकीय रोजगार देऊ शकत नाही , परंतु उद्योजक तर निर्माण होऊ शकतात , उद्योगधंद्यांना पोषक वातावरण निर्माण करता येऊ शकते.असे प्रतीपादन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रताप दिघावकर यांनी केले.

- Advertisement -

अर्थ – उद्योगच्या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन येथील निमा सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजकांच्या आणि उद्योग संघटनांच्या अध्यक्षांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, उद्योजक रुद्रेश कांगणे ,ज्येष्ठ उद्योजक अरविंद पांचाल , अनिल धुमाळ, आनंद आनंद ऍग्रो समुहाचे अध्यक्ष उद्धव आहेर ,ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक प्रकाश लढ्ढा, अविनाश शिरूडे, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे , नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार उपस्थित होते .

नाशिक शहराचा औद्योगिक विकास इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत झपाट्याने होऊ शकतो, परंतु त्यासाठी राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती असायला हवी आणि उद्योगांची पळवा पळवी पुण्याकडे व्हायला नको असे ठाम प्रतिपादन धनंजय बेळे यांनी केले .

प्रास्ताविक श्री रमेश पवार यांनी केले. अर्थ उद्योग मासिकाचे संपादक गोरख पगार यांनी मासिक अर्थ उद्योगच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी उद्योजक सुभाष पाटील , सुरेश देशमुख , राजेश जाधव, संदीप सोनार, महेंद भामरे, राजेंद्र वडनेरे, राजेंद्र अहिरे , विशाल ठक्कर , हिमांशू कनानी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या