Thursday, September 12, 2024
Homeनगरशासनाच्या दुधदर धोरणाबाबत दुध उत्पादकांत नाराजी

शासनाच्या दुधदर धोरणाबाबत दुध उत्पादकांत नाराजी

खैरी निमगांव |वार्ताहर| Nimgav Khairi

महाराष्ट्र शासनाने गायीच्या दुधासाठी 3.5/8.5 गुणप्रत (Cow Milk Quality) असलेल्या दुधास (Milk) 34 रुपये दर देणे बंधनकारक असेल असा अध्यादेश जारी केला आहे. सदरचा अध्यादेश (Ordinance) म्हणजे दुध उत्पादकांची फसवणूक (Fraud) असल्याच्या प्रतिक्रिया सध्या दुध संकलन केंद्रावर (Milk Collection Center) सुरु आहेत.

- Advertisement -

एमआयडीसीचे आरक्षण टाकून, जागा विकणे म्हणजे विकास नव्हे

खैरी निमगांवमध्ये (Nimgav Khairi) मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय (Dairy Business) केला जातो. मात्र सध्या मिळणारा दर हा निराशाजनक आहे. 3.5/8.5 गुणप्रत व्यतिरिक्त त्याखालील गुणप्रतिस किती दर द्यावा, अशी कोणतीही मार्गदर्शक नियमावली जारी नसल्यामुळे दुध संघ दरामध्ये (Milk Union Rates) मोठ्या प्रमाणात कपात करत आहेत. पुर्वी 3.5 फॅटच्या खालील प्रत्येक गुणप्रत असलेल्या दुधास 50 पैसे प्रमाणे कपात होती, तसेच एसएनएफ 8.5 खालील प्रत्येक गुणप्रत असलेल्या दुधास 30 पैसे प्रमाणे कपात होती. नवीन अध्यादेश आल्यानंतर खाजगी संघांनी पळवाट काढली आहे.

माजी खा. वाकचौरे लवकरच ठाकरे शिवसेनेत

फॅटच्या गुणप्रतिस 50 पैसे कपात तशीच ठेवली मात्र एसएनएफ 8.5 च्या खालील प्रत्येक गुणप्रतिस 30 पैसे ऐवजी एक रुपयाने कपात चालु केली आहे. मात्र ज्या दुधाचा एस एन एफ 8.5 पेक्षा अधिक आहे. त्यांच्या दरात वाढ कपातीच्या प्रमाणात नसल्याने शासनाच्या धोरणावर दुध उत्पादक नाराज आहेत. बहुतांशी दुधाचा एसएनएफ (Milk SNF) हा 8.3 दरम्यान लागतो त्यामुळे दुध उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 3.2 फॅट 8.3 एसएनएफ या गुणप्रतीला 34 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा उत्पादक व्यक्त करत आहेत. एक रुपयाने होणारी कपात त्वरीत रद्द करून पुर्वीप्रमाणेच कपात करण्याची मागणी होत आहे.

मित्रांच्या जागांसाठी आ. पवार यांचा एमआडीसीचा घाट

- Advertisment -

ताज्या बातम्या