Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यपाल आचार्य देवव्रत १ व २ जानेवारीस नाशिक दौर्‍यावर

राज्यपाल आचार्य देवव्रत १ व २ जानेवारीस नाशिक दौर्‍यावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

राज्यपाल महामहीम आचार्य देवव्रत उद्या दिनांक १ जानेवारी २०२६ ला नाशिक जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौर्‍यावर येणार आहेत या दौर्‍याचे संपूर्ण नियोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, दौर्‍यात कृषी, आदिवासी विकास, आरोग्य, प्रशासन व औद्योगिक क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

YouTube video player

दौर्‍याच्या पहिल्या दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत सकाळी नाशिक येथे आगमन करून दिंडोरी तालुक्यातील पिंपळखेड येथे जाणार आहेत. त्यानंतर ओझर विमानतळावरुन मोखाडी येथील सह्याद्री फार्ममध्ये शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी सेवा केंद्र चालक तसेच कृषी अधिकार्‍यांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी सूक्ष्म शेवाळावर आधारित पाणी शुद्धीकरण व पुनर्वापर प्रकल्पाची पाहणी राज्यपाल करणार असून, शाश्वत शेती व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन अपेक्षित आहे. सायंकाळी पिंपळखेड येथे ‘प्रशासन गाव की ओर’ अभियानांतर्गत आयोजित आरोग्य व पशुसंवर्धन शिबिर तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या वृक्षारोपण उपक्रमात राज्यपाल सहभागी होणार आहेत.

त्यानंतर शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत स्वागत समारंभ, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम व चौपाळ संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांद्वारे आदिवासी समाजाशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला आहे.

शुक्रवार 2 जानेवारी 2026 – दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत आदिवासी निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत योगाभ्यास करणार असून, त्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतभेटी घेऊन नैसर्गिक शेतीविषयक उपक्रमांची माहिती घेणार आहेत. खोर्‍यापाडा येथे नैसर्गिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांशी संवाद साधल्यानंतर ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी व कामगारांशी संवाद साधणार आहेत.

या दौर्‍यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व संबंधित विभागांना आवश्यक त्या सुविधा, सुरक्षा व समन्वयाबाबत सूचना देण्यात आल्या असून, दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...