नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दि.9 सप्टेंबर २०२४, सोमवार रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
राज्यपाल राधाकृष्णन यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता ओझर विमानतळ येथे आगमन होईल. शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11.40 ते दुपारी 12.10 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील खासदार, आमदार यांंच्याशी ते संवाद साधतील. त्यांनतर ते नाशिक जिल्ह्यातील विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतील.
त्या नंतर विविध राजकीय पक्ष, संघटना प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञाशी संवाद साधतील. दुपारी 4.40 वाजता ओझर विमानतळ येथून विमानाने पुढील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण करतील.
तामीळनाडुच्या राजकारणात गेले चार दशके सक्रीय असलेले राधाकृष्णन यांनी गेल्या महीन्यातच राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतरचा त्यांचा हा नाशिकचा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे ते एखाद्या कार्यक्रमाला न येता थेट लोकप्रतीनीधी व विविध संघटनांशी संवाद साधणार असल्याने त्यांच्या दौर्या बद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. पहील्यांदाच राज्यपाल अशा पध्दतीने सवाद साधत असल्याने या दौर्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
नाशिक नंतर राज्यपाल राधाकृष्णन यांचा10 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचा संभाव्य दौरा होण्याची शक्यता आहे.त्याही दौर्यात ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत.