Saturday, July 27, 2024
Homeनगरराज्य शासन व केंद्राला शेतकरीप्रश्नी शिफारस करणार

राज्य शासन व केंद्राला शेतकरीप्रश्नी शिफारस करणार

खैरी निमगाव |प्रतिनिधी| Khairi Nimgav

शेतीमाल निर्यातबंदी आणि शेतीमालाच्या हमीभावाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारला तर शेतकर्‍यांचे झालेले आर्थिक नुकसान

- Advertisement -

याबाबत राज्य सरकारला शिफारस करणार असल्याचे आश्वासन महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरीचे शेतकरी पुत्र संतोष भागडे यांना दिले.

शेतीमाल निर्यातबंदी आणि शेतीमालाच्या हमीभावाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारला तर अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे झालेले नुकसान, शेतकरी कर्जमाफी, विजेचे सुलतानी वेळापत्रक, उत्कृष्ट बियाणे आणि रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, शेतकर्‍यांना मिळणारी वैयक्तिक अपघात विम्याची तुटपुंजी विमा रक्कम, अतिवृष्टी, महापूर, गारपीट यामुळे नुकसान होऊन मिळणारी तुटपुंजी शासकीय मदत, धरणाच्या पाण्याचे शेतीसाठीचे विस्कळीत नियोजन, पीक विम्याची प्रभावीपणे होत नसलेली अंमलबजावणी, दुधाला मिळत नसलेला रास्तभाव, पीक कर्जासाठी बँकेकडून मिळणारी सपत्नीक वागणूक, शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणीचा अभाव, कोरोना महामारी मुळे फळ बागायतदार शेतकर्‍यांचे झालेले आर्थिक नुकसान याबाबत राज्य सरकारला शिफारस करणार असल्याचे आश्वासन महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री. भागडे यांना दिले.

शेती आणि शेतकर्‍यांच्या समस्या मांडण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तरुण शेतकरी संतोष पाराजी भागडे यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. त्याची दखल घेऊन राज्यपाल महोदयांनी त्यांना काल 3 ऑक्टोबर 2020 सकाळी 11ः30 वाजता भेटीचे निमंत्रण दिले त्यानुसार राजभवनातील राज्यपालांच्या निवासस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 40 मिनिटांचा वेळ दिला.

सध्या राज्यातील शेतकर्‍यांना भेडसावत असलेल्या सर्व समस्यावर राज्यपाल महोदयांबरोबर सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांचे दुःख भागडे यांनी त्यांच्या कानावर घातले. तसेच शेतकर्‍यांच्या समस्या वर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

राज्यपाल हे राज्याचे संविधानात्मक प्रमुख तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामधील दुवा असल्याने निश्चितच बळीराजाचे दुःख समजून घेऊन त्यांच्याकडून शेतकर्‍यांना नक्की न्याय मिळणार आहे, असा विश्वास श्री. भागडे यांनी व्यक्त केला. श्री. भागडे यांच्या समवेत युवा कीर्तनकार दादा महाराज रंजाळे, नितीन खळदकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या