Saturday, September 21, 2024
Homeनगरपदवीधर निवडणुकीत त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पदवीधर निवडणुकीत त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

वेगवेगळ्या निवडणुकीत यापूर्वी आपण काम केले असले तरी प्रत्येक निवडणूक नवीन असते. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत त्रुटी राहणार नाहीत. याची निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचार्‍यांनी विशेष दक्षता घ्यावी. अशा सूचना नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी येथे दिल्यात.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 साठी नियुक्त अधिकारी-कर्मचार्‍यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण सत्र सहकार भवन सभागृहात सोमवारी पार पडले. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गमे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने मतदार प्रक्रियेविषयी दिलेल्या सूचना व नियमांचे प्रत्येक केंद्राध्यक्षांनी काळजीपूर्वक पालन करावे. ईव्हीएम व बॅलेट पेपरद्वारे पार पडणारे मतदान यामधील फरक समजून घ्यावा. फॉर्म 16 हा या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा असतो. फॉर्म 16 चे काटेकोरपणे अवलोकन करावे्. मतदान केंद्रावरील सूक्ष्म हालाचालींची वेब कॅमेर्‍याव्दारे निवडणूक आयोग प्रत्येक क्षणाला पडताळणी करत असते. त्यामुळे केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्रावरील सर्व सूक्ष्म घटनेच्या वेळोवेळी नोंदी ठेवाव्यात. संपूर्ण निवडणुकीत कोणत्याही प्रकाराच्या त्रुटी राहू नये. गोंधळ निर्माण होऊ नये. यासाठी काळजी घ्यावी. अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

तहसीलमध्ये एक खिडकी कक्ष

विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या तात्काळ प्राप्त करून घेण्यासाठी तालुका स्तरावर तहसील कार्यालयात एक खिडकी सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्गमित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या