Monday, July 15, 2024
Homeनगरतिसर्‍या दिवशी पदवी परीक्षा सुरळीत

तिसर्‍या दिवशी पदवी परीक्षा सुरळीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पुणे विद्यापीठांतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये पहिल्या दोन दिवशी गोंधळ झाल्यानंतर अखेर

काल बुधवारपासून तिसर्‍या दिवसापासून परीक्षा सुरळीत सुरू झाली. याबाबत अनेक परीक्षा केंद्रांकडून विद्यापीठाकडे तक्रारी झाल्या होत्या. त्याची दखल घेत विद्यापिठाने परीक्षेच्या कामकाजात सुसूत्रता आणली.

पुणे विद्यापीठांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन पर्यायांमध्ये विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. पहिल्या व दुसर्‍या दिवशी ऑफलाईन परीक्षा देणार्‍या मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आवश्यक असणारा ओटीपी विद्यापीठाकडून वेळेत न आल्यामुळे पहिल्या दोन्ही दिवशी परीक्षा तब्बल अडीच ते तीन तास उशिराने सुरू झाली. यामुळे परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक, प्राचार्य, तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करून विद्यापीठाकडे याबाबत तक्रारी केल्या.

त्याचा परिणाम बुधवारी तिसर्‍या दिवशी परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. ऑफलाईन परीक्षेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी 34 केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी बुधवारी परीक्षा सुरळीत झाल्या. ऑनलाईन परीक्षेमध्येही मुलांना फारशा अडचणी आल्या नाहीत. बुधवारी विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे 36 विषयांच्या परीक्षा पार पडल्या.

पदवी परीक्षेच्या पहिल्या दोन दिवस विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागले. याबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. विद्यापिठाने पूर्ण तयारी न करताच परीक्षा आयोजित केल्याने हा गोंधळ उडाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. निदान यापुढील सर्व पेपर सुरळीत व्हावेत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या