Thursday, November 14, 2024
Homeनगरऑफलाईन धान्य वाटपाचे निर्देश

ऑफलाईन धान्य वाटपाचे निर्देश

रेशनचे धान्य || सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वितरण ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

धान्य वितरणाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून होणारे वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. तोपर्यंत पुरवठा विभागाला आयएमपीडीएस पोर्टलद्वारे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस यंत्रावर अंगठा न लावता देखील धान्य मिळू शकणार आहे. तसेच धान्य वितरण करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या सुत्रांनी दिली.

- Advertisement -

गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईवरून सर्व्हरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे जुलै महिन्यांतील धान्य मिळण्यासाठी लाभार्थींना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यामुळे वाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांसमोर निर्माण झाला होता. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड अद्यापही कायम आहे. यामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थींना धान्य वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांतून ऑफलाईन पद्धतीने धान्याचे वितरण करताना शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक आहे.

यासाठी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, शिक्षक आदी कर्मचार्‍यांकडेही जबाबदारी देण्यात येणार आहे. ई-पॉस मशीन सर्व्हरशी जोडली जात नसल्याने धान्य वितरणाचा गंभीर प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना धान्य मिळत नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुुळे पूर्वीसारखी ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य रेशन दुकानदारांकडून करण्यात आली होती.

जुलैच्या धान्य वितरणास मुदतवाढ
स्वस्त धान्य दुकानदारांचे लॉगिन आयएमपीडीएस पोर्टलवर तयार करण्यात येणार आहेत. सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली आहे. ऑफलाईन धान्याचे वितरण करताना शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत असणार आहेत. सोबत धान्य वितरणाची नोंद एका रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे. जुलै महिन्याचे धान्य वितरण करण्यास दहा ते बारा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या