Sunday, May 11, 2025
HomeनगरAhilyanagar : धान्य साठवणूक वाढवण्यासाठी पुरवठा विभागाची धावपळ

Ahilyanagar : धान्य साठवणूक वाढवण्यासाठी पुरवठा विभागाची धावपळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आपत्कालीन व्यवस्था म्हणून केंद्र सरकारने नागरिकांना पुढील तीन महिने पुरेल एवढे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रेशनवर मिळणार्‍या धान्याची साठवणूक वाढवण्यासाठी जिल्हा पुरवठा खात्याला राहाता, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड, राहुरी आणि कोपरगाव या ठिकाणी अतिरिक्त गोडाऊन उपलब्ध करावे लागणार आहेत. या दृष्टीने पुरवठा विभागाने नियोजन सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, नगर जिल्ह्याला दर महिन्यांला पुरवठा विभागाला 17 हजार मॅट्रिक टन धान्य वितरण करावे लागते. यात आता तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्यासाठी पुरवठा विभागाला 50 हजारांहून मॅट्रिक टन धान्यांचा साठा जिल्ह्यासाठी करावा लागणार आहे. यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना सरकारमार्फत पुरवठा करणार्‍या मोफत धान्याची अडचण निर्माण होऊ नये, प्रत्येकाला पोटभर अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने पुढील तीन महिने रेशन मार्फत वितरित करण्यात

येणार्‍या धान्याचे आगाऊ वितरण करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी पुरवठा विभागाला प्रत्येक तालुक्याला आवश्यक असणार्‍या रेशनच्या धान्याचा साठा वाढवण्यासाठी अतिरिक्त गोडावूनची गरज लागणार आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यात जादाचे धान्य साठा सावणुकीसाठी अतिरिक्त गोडावून पुरवठा विभागाकडे सध्या उपलब्ध नाही. यात राहाता, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड राहुरी आणि कोपरगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

या ठिकाणी पुढील काळात तातडीने अन्य शासकीय विभाग, वखार महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह उपलब्ध असणार्या गोडाऊनची माहिती घेऊन त्या ठिकाणी रेशनवर पुरवठा करण्यात येणार्या धान्याची साठवणूक करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पुरवठा विभागाने माहिती मागवली असून पुढील काही दिवसात संबंधित विभागाचे गोडाऊन रेशन धान्य साठवणुकीसाठी पुरवठा विभाग उपलब्ध करणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात रेशन वरून पुढील तीन महिन्याच्या धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याची पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

वखार मंडळाकडील माहिती मागवली
जिल्ह्यात अनेक ठिकाणी वखार महामंडळाचे गोडावून आहेत. या ठिकाणी असणार्या गोडावूनची सध्याची स्थिती, उपलब्ध असणार्या गोडावूनची स्थितीसह अन्य ठिकाणी असणार्या शासकीय, निमाशासकीय, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडावूनची माहिती पुरवठा विभागाने तातडीने मागवली आहे. ही माहिती आल्यावर संबंधीत गोडावून रेशनच्या धान्याच्या वाढील स्टॉकसाठी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा सोयाबीन घटणार, मका, तूर क्षेत्र वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 ची तयारी सुरू आहे. यंदा हंगामासाठी सात लाख 42 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान हंगामासाठी...