Saturday, May 4, 2024
Homeनगरखरवंडीत 14 सदस्य बिनविरोध

खरवंडीत 14 सदस्य बिनविरोध

खरवंडी (वार्ताहर) –

नेवासा तालुक्यातील खरवंडी ग्रामस्थांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे खरवंडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

- Advertisement -

पार पडली. 15 पैकी 14 जागांवर उमेदवार शिल्लक राहिल्याने या सर्व 14 जागा बिनविरोध निवडून आल्या तर एक जागा रिक्त राहिली आहे.

याबाबत माहिती अशी की, खरवंडी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी अर्ज सादर करण्यापूर्वी घेतला होता. त्यावेळी पंधरा सदस्यांच्या चिठ्ठ्या काढण्यात येऊन सर्व प्रभागातील उमेदवार ठरविण्यात आले होते.

के. एम. बाबा फाटके महाराज, राम महाराज बोचरे, संत ज्ञानेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन नाथाभाऊ पंडित, पोलीस पाटील संदीप फाटके, काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष नानासाहेब फाटके, माजी सरपंच शिवाजी अण्णा फाटके, मुळा कारखान्याचे संचालक जबाजी फाटके, माजी जिल्हा परिषद सदस्य आजित फाटके, पी. वाय. कुर्‍हे, मुकूंद भोगे, मेजर अरुण फाटके, रावसाहेब भोगे, डॉ. नवनाथ कुर्‍हे याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय होऊन उमेदवार निश्‍चित झाले होते.

गावातील जागृत महादेवाचे मंदिर, खंडोबा मंदिर, चर्च यांचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले असून निवडणूक अधिकारी सुरेश भोगे यांनी दुपारी 3 वाजता 15 जागांसाठी 14 जागा बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवून सर्व 15 उमेदवार निश्‍चित करण्यात आले होते मात्र 15 जागांसाठी एकूण 17 अर्ज भरण्यात आले होते. प्रभाग 3 व प्रभाग4 मधून प्रत्येकी एक उमेदवार अधिक होता. प्रभाग 3 मधील वैभव बाळासाहेब फाटके व प्रभाग 4 मधील सुरेश केरु कातोरे यांनी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्र. एक मधील ओबीसी महिला प्रवर्गासाठीच्या जागेसाठी विद्यमान सदस्य यमुनाबाई विश्‍वनाथ कुर्‍हे यांचे नाव निश्‍चित होवून त्यांनी अर्ज भरलेला होता. मात्र गेल्या निवडणुकीचा निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याच्या कारणावरुन त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्यामुळे प्रभाग एकमधील ओबीसी महिला या प्रवर्गाची एक जागा रिक्त राहिली आहे.

पोलीस पाटील संदिप फाटके यांनी गावातील सर्व ज्येष्ठ राजकीय पुढार्याशी चर्चा करून बिनविरोध करण्यास सहकार्य केले.

बिनविरोध निवडून आलेले 14 उमेदवार

शिवाजी रामदास कुर्‍हे, गोरखनाथ श्रीधर शिंदे, संतोष पंढरीनाथ बुचकूल, संगीता संतोष राजळे, वर्षा पोपट मिसाळ, अण्णासाहेब विष्णू बेल्हेकर, प्रियंका सतिश भोगे, सुशिला अरूण फाटके, हिराबाई भिमराज बर्डे, गणेश विलास खाटिक, सुवर्णा मुकूंद भोगे, गणेश मोहन फाटके, मनीषा चंद्रशेखर म्हस्के, हर्षदा संतोष भोगे.

- Advertisment -

ताज्या बातम्या