Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याGram Panchayat Election Result : दत्तनगरमध्ये ससाणे गटाने सत्ता राखली, सरपंच पदी...

Gram Panchayat Election Result : दत्तनगरमध्ये ससाणे गटाने सत्ता राखली, सरपंच पदी सारिका कुंकलोळ

दत्तनगरमध्ये ससाणे गटाने सत्ता राखली, सरपंच पदी सारिका कुंकलोळ ससाणे गटाला 9 तर विखे गटाला 7 जागा तर वंचितला 1 जागा

- Advertisement -

टिळकनगर (वार्ताहर)

तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून यात ससाणे गटाने बाजी मारली असून स्पष्ट बहुमत मिळवून विखे गटाला पराभूत केले आहे. दत्तनगर ग्रामपंचायतिच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकित स्वर्गीय जयंत ससाणे गटाच्या ग्रामविकास आघाडीला सरपंच पदासह 9 सद्यस्य विजय झाले आहे तर विखे गटाच्या कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांच्या नेर्तृत्वाखाली 7 जागा तर वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर आपला झेंडा फडकविला. माजी लोकनियुक्त सरपंच सुनिल शिरसाठ यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे लागले. सुरुवातीपासून तिन्ही गटाने प्रचारांत शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी घेतली मात्र आज जनतेने ससाणे गटाच्या बाजूने कौल दिल्याने गावाचा कारभार एकहाती दिल्याचे दिसून येत आहे.

सरपंच पदासाठी प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

सारिका कुंकलोळ- 2311 (विजयी)

रोजलीन निकम-1444

योगिता क्षीरसागर-210

सद्यस्य पदासाठी विजयी झालेले उमेदवार-

प्रभाग क्र-1- संजय बोरगे, शालिनी मगर,

प्रभाग- 2)- राजेंद्र मगर, राणी खाजेकर, शाकेरा बागवान

प्रभाग-3)- सागर भोसले, सुनील शिंदे, प्रीती ब्राह्मणे

प्रभाग-4-लक्ष्मण कडवे, प्रेमचंद कुंकलोळ, नयना शेवाळे,

प्रभाग 5- पोपट पठारे, भारती आव्हाड, सूनयना शिवलकर,

प्रभाग 6- विशाल पठारे, राजश्री खंडागळे, कुसुम बाई जगताप

लक्षवेधी लढतीत यांनी मारली बाजी-

1)-प्रभाग क्रं-3-मधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांचा सामना ससाणे गटांकडून हिरामण जाधव यांच्याशी होता त्यात शिंदे विजयी झाले.

2)-प्रभाग क्रं-3 मध्ये माजी लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ यांची लढत विखे गटातील सागर भोसले यांच्याशी होती सागर भोसले यांनी शिरसाठ यांना परभावाचा धक्का दिला.

3)-प्रभाग 1 मध्ये भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांची पत्नी शालिनी मगर यांची लढत स्व. जयंतराव ससाणे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब विघे यांच्या पत्नी आम्रपाली विघेशी होती त्यात विघे पराभूत झाल्या.

4)- प्रभाग 6 मधून आर. पी. आयचे भीमा बागुल यांची लढत ससाणे गटाच्या अरुण वाघमारे सह वंचित उमेदवाराशी होती त्यात वंचितचा उमेदवार विजयी झाला.

5)-प्रभाग क्रं 3 मधून सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांची मातोश्री सोनुबाई लोंढेची लढत विखे गटाच्या प्रीती ब्राह्मणेशी होती त्यात ब्राह्मणे यांनी बाजी मारली आहे.

राहता तालुक्यातील वाकडीत 17 जागापैकी कोल्हे गट 9 आघाडीवर जागेवर आघाडीजुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयातीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. ठाकरे गटाचे 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले आहेत. तर सरपंच पद हे ठाकरे गटाकडे गेले आहे.ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने सर्वाधिक 121 ग्राम पंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. त्याखालोखाल दादा गटाने 94 ग्राम पंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.संगमनेर तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय. विखे पाटील गटाची सत्ता. सरपंचपदी नितीन म्हतारबा आहेर विजयी. यापूर्वी होती उद्धव ठाकरे गटाची सत्ता.कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का. कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर कुंभेफळ आणि खेड गावात भाजपचा सरपंच, तर आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा कर्मनवाडी येथे विजय.

हवेली तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती या शरद पवार गटाने जिंकल्या आहेत. वाडेबोल्हाई, खामगाव मावळ, कोलवडी साष्टे या तिन्ही गावात शरद पवार गटाचे सरपंच विजयी झाले आहेत,श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचा निकाल हाती. काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी. जिल्ह्यातील दोन निकाल हाती, एक काँग्रेसकडे तर एकावर शरद पवार गटाचा विजय. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला धक्का.

बारामतीमधील 8 ग्रामपंचायतींपैकी 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाच वर्चस्व. अजित पवार गटाची सत्ता.सांगोल्यात शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का, खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे संजय दिक्षीत विजयी

मंगळवेढा तालुक्यातील ९ ग्रामपंचायत भाजपने जिंकल्या. देगाव, खडकी, जूनोनी, महमदबाद, अकोले, उचेठान, बठान, शेलेवाडी जिंकल्या आहेत, तर शिरसी ग्रामपंचायत स्थानिक आघाडी विजयी झाले आहेत.
पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खातं उघडलं. पालघरमधील उच्छेळी आणि उनभाट ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरेंची मशाल . दोन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सरपंच विजय.बारामती तालुक्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल हाती आले आहेत. या तीनही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सत्ता गेली आहे. भोंडवे वाडी, म्हसोबा नगर आणि पवई माळ या तिन्ही ठिकाणी अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विजयी..पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये ४० वर्षानंतर सत्तांतर. अभिजीत पाटील गटाचे दिपक शिंदे विजयी. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे गटाला मोठा धक्का. विठ्ठलचे माजी संचालक मोहन कोळेकर गटाला मोठा धक्का.कराडमधील येणपे ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. चव्हाण आणि उंडाळकर गटाला सत्ता राखण्यात यश आले आहे. दक्षिण सोलापूरमधील दोड्डी ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली आहे. दोड्डी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.आतापर्यंत महायुतीचा १९९ ग्रामपंचायतींवर विजय झाला आहे. भाजप आणि अजीत पवार गटामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा आतापर्यंत ६९ ग्रामपंचायतीवर विजय झाला आहे.राधानरगरीमधील चांदेकरवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. तर, करवीरमध्ये शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला आहे.ग्राम पंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल हाती आला आहे. शिंदे गटाने विजयी शुभारंभ केला आहे. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी ग्राम पंचायत शिंदे गटाकडे केली आहे.राज्यात एकूण २३५९ ग्राम पंचायती आहेत. त्यात २९३ ग्राम पंचायतींचे निकाल बिनविरोध लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या