सटाणा । प्रतिनिधी | Satana
ताहाराबाद (Taharabad) ग्रामपंचायतीला (gram panchayat) विविध विकासकामांसाठी शासनाकडून मिळालेल्या 14 व 15 व्या वित्त आयोग निधीत (Finance Commission Fund) लाखो रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ग्रामसेवक स्वप्नील ठोके (Gram Sevak Swapnil Thoke) यास जायखेडा पोलिसांनी (Jaykheda Police) अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन (Shiv Sena’s taluka chief Subhash Nandan) यांनी ताहाराबाद (Taharabad) ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी शासनाकडून मिळालेल्या 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत (fund) लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व पं.स. गटविकास अधिकार्यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने संबंधित अधिकार्यांनी सविस्तर चौकशी केली असता ग्रामपंचायतीला मिळालेल्या विकासकामांच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे उघडकीस आले.
त्यानुसार 19 एप्रिल 2022 रोजी बागलाण पं.स. गटविकास अधिकारी कोल्हे (Baglan Panchayar Samiti Group Development Officer Kholhe) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय निधीत (Government fund) अफरातफर व भ्रष्टाचार केल्याप्रकरणी विद्यमान सरपंच शितल योगेश नंदन, ग्रामविकास अधिकारी स्वप्निल ठोके व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्याविरूध्द जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यात पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता पाटकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. परंतु शितल नंदन व स्वप्नील ठोके हे फरार होते. ताहाराबाद ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात जायखेडा पोलिसांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडल्याबद्दल गावकर्यांनी कौतुक केले आहे. पुढील तपास सपोनि श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. सुनील पाटील हे करीत आहेत. सरपंच शितल नंदन यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलीसी सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी चार महिन्यांपासून फरारी होते. त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने व पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमुळे ग्रामसेवक स्वप्निल ठोके यास सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे त्याने जायखेडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे सपोनि पारधी यांनी सांगितले.
ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या शासकीय निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार व अफरातफरीबाबत आपण दिलेल्या लढ्यास यश मिळाले आहे. पं.स. गटविकास अधिकारी कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिसांनी तत्परतेने कार्यवाही करून संबंधित संशयित आरोपींना अटक केल्याने शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी समाधान व्यक्त केले आहे.