Friday, December 6, 2024
Homeनगरसरपंच पदासाठी फिल्डींग टाईट

सरपंच पदासाठी फिल्डींग टाईट

अहमदनगर (प्रतिनिधी) –

मागील महिन्यांत झालेल्या जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवार (दि.9) व बुधवार (दि.10) सभा होत

- Advertisement -

आहेत. सरपंचपदावर आपल्या सदस्यांची वर्णी लागावी, यासाठी निवडणूका झालेल्या गावात आतापासून फिल्डींग टाईट करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर खबरदारी म्हणून सदस्य आणि गाव पुढार्‍यांनी सदस्यांनी सहलीवर धाडण्यात आले आहे. गावचा कारभार आपल्याच हाती राहण्यासाठी सदस्यांची पळवापळवीची शक्यता असून विविध अमिष दाखविले जात आहे.

करोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यत आला होता. जानेवारी महिन्यांत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नगरसहर राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. यात जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश होता. यात 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 9 ठिकाणी मार्च महिन्यांत पोटनिवडणूका होणार आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत निकालानंतर अनेक ग्रामपंचायतींवर आपलीच सत्ता असल्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याच्या नेते मंडळींकडून दावा केला जात आहे. तर विरोधाला विरोध नको म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले कारभारीही भाजप व महाविकास आघाडीच्या मांडवात जावून फेटे बांधून घेतांना दिसले. जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचांची निवड 9 व 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी गाव पुढार्‍यांनी खबरदारी म्हणून सदस्यांना सहलीवर पाठविले आहे.

मंगळवारी अर्ध्या आणि बुधवारी उर्वरित ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारपडण्याची जबाबदारी त्यात्या विभागाचे प्रांताधिकारी यांंच्या खांद्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोपविली आहे.

………………

नगर तालुक्यात कोणाचा दावा खरा

नगर तालुक्यात 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायतीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला. परंतु, भाजपाचे नेते माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी 47 तर नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी 33 ग्रामपंचायतींवर आपलीच सत्ता आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी होणार्‍या सरपंच-उपसरपंच निवडीनंतरच कर्डिले-गाडे यांचा दावा खरा की खोटा हे स्पष्ट होणार आहे.

………………..

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या