Thursday, March 13, 2025
Homeनगरगावपुढार्‍यांना लागले ग्रामपंचायत निवडणुकीचे डोहाळे

गावपुढार्‍यांना लागले ग्रामपंचायत निवडणुकीचे डोहाळे

लांबणीवर पडलेल्या 84 ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य मंडळ आणि वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त असणार्‍या 155 सदस्यांच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा निवडणूक विभागाने जुलै महिन्यातच प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यामुळे गाव पुढार्‍यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. दरम्यान, कोणत्याहीक्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकीत चुकीची प्रभाग रचना झालेल्या, तसेच बहिष्कार व अन्य कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या राज्यातील सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी, तसेच सदस्य अथवा थेट सरपंच यांच्या रिक्त असणार्‍या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी प्रभागनिहाय मतदार यादी जुलै महिन्यात प्रसिध्द करण्यात आली आहे.

यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 84 ग्रामपंचायत आणि 155 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षभरापासून गाव कारभारी निवडणुक कधी होईल याची वाट पाहून आहेत. सध्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. सुरूवातीला लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपवून सव्वा महिला झाला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीची निवडणुक कोणत्याही क्षणी लागू शकते असा अंदाज आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील 84 गावातील राजकीय वातावरण तापणार आहे.
दरम्यान, जुलै महिन्यांत प्रसिध्द करण्यात आलेली प्रभागनिहाय मतदार यादी ही लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीवर आधारीत होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनूसार नव्याने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करावी लागल्यास त्यात वेळ जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत राज्य निवडणुक आयोगाकडून कोणत्याही सुचना आल्या नसल्याचे जिल्हा निवडणुक शाखेकडून सांगण्यात आले.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे : नेवासा 26, कर्जत 17, अकोले 8, नगर 7, संगमनेर 2, कोपरगाव 3, राहाता 1, श्रीरामपूर 2, राहुरी 3, शेवगाव 5, पाथर्डी 4, जामखेड 3, श्रीगोंदा 1 आणि पारनेर 1.

15 ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम प्रसिध्द
जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचा प्रारूप प्रभाग रचना आरक्षण कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला आहे. यावर 31 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान हरकती घेता येणार आहे. त्या हरकतीवर 14 जानेवारीला प्रांतअधिकारी यांच्या समोर सुनावणी होणार असून 24 जानेवारीला अंतिम प्रभाग रचना आरक्षण कार्यक्रम प्रसिध्द करण्यात येणार आहे. या 15 ग्रामपंचायतीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 6, अकोले 3, संगमनेर 2, पारनेर 2, कर्जत 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...