Thursday, May 8, 2025
Homeनाशिकग्रामपंचायत निवडणूक : स्थानिक आघाड्या झाल्या, कुणी एक मताने विजयी तर कुणी...

ग्रामपंचायत निवडणूक : स्थानिक आघाड्या झाल्या, कुणी एक मताने विजयी तर कुणी मोडला संकल्प

सटाणा | तालुका प्रतिनिधी Satana

तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत (Grampanchayat Election) एकूण 13 पैकी 3 ग्रामपंचायती (Grampanchayati) यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 10 ग्रामपंचायतींसाठी मतदान (Grampanchayat Voting) काल (दि ०४) सुरळीत पार पडले. त्यांनतर आज (दि. 5) सकाळी 10 वाजता तहसील परिसरात मतमोजणी (Vote Counting) करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी कामकाज केले…

- Advertisement -

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यापूर्वी तालुक्यातील साळवण, देवपूर (चाफापाडा) व करंजखेड या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर, सद्यस्थितीत बोरदैवत, बुंधाटे, बोऱ्हाटे, भिलदर, दसवेल, अंतापुर,वाठोडा, बाभुळणे, भावनगर, साकोडा आदी ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. या निवडणुकीत नवोदितांनी प्रस्थापितांवर वर्चस्व निर्माण केल्याची स्थिती आहे.

मतदान काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून, मतदान शांततेत संपन्न झाल्याची माहिती, सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार व जायखेडा सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील13 पैकी यापूर्वी बिनविरोध निवड झालेल्या 3 ग्रामपंचायत व नवनिर्वाचित सदस्य

साळवण- (एकूण 7 सदस्य)

रामा लहानू बागुल, भारती संजय ठाकरे, अनुसया जिभाऊ भानसी, जिजाबाई गंगाराम आहिरे, काळू श्रीपत सोनवणे, रमेश बापू चौरे

देवपूर-(चाफापाडा)-* ( एकूण 7 पैकी 5 बिनविरोध 2 रिक्त )

दिलीप पंडीत जगताप, कमलबाई अशोक बागुल, नर्मदा लक्ष्मण गांगुर्डे, कौस्तुभ बळीराम बागुल, दत्तू पंडित जगताप

करंजखेड- ( 7 पैकी 6 जागा बिनविरोध 1 रिक्त )

लक्ष्मण नानाजी देशमुख, आत्माराम गोविंदा चौरे, कांताबाई एकनाथ देशमुख, संगीता हुसन सोनवणे, रंजनाबाई अण्णा सोनवणे, हिराचंद डोंगर निकम

मतमोजणीनंतर उर्वरित 10 ग्रामपंचायतींचा निकाल व विजयी उमेदवार

बाभुळणे- (एकूण 9 पैकी 4 बिनविरोध)

सुक्राम गणपत पवार, शिवाजी जिवल्या माळीस, बेबीबाई बाळू माळी, पोपट चिल्या चौरे, कल्पना उत्तम कामडी, योगिता पंडित महाले, धावल्या मतीराम चौरे, मीना गोविंद राऊत, अंजना काळू वाघ

वाठोडा- (7 पैकी 5 बिनविरोध)

छबी छगन बहिरम, सदा बारकू जाधव, नवनाथ काळू ठाकरे, इंदिरा नामदेव ठाकरे, महादू सीताराम कांबडी, संजय बाळू ठाकरे, सुनीता सोमनाथ सूर्यवंशी

साकोडे- (7 पैकी 4 बिनविरोध)

दशरथ एकनाथ बागुल, संगीता राजेश गायकवाड, सरला लक्ष्मण देशमुख, रामदास श्रावण मोरे, दत्तू महारु गायकवाड, मीना भगवान पवार, सविता देविदास मोरे

अंतापूर- (एकूण 15 सदस्य)

शरद लोटन खैरनार, रेखा हरीष साबळे, सुशीला दिलीप गवळी, किरण बाळू सोनवणे, मदन पंडित खैरनार, सरला वसंत बागुल, दावल गेंदा ब्राम्हणे, सुनील शिवराम गवळी, मीराबाई साहेबराव मानकर, संतोष पिराजी पवार, मिनाबाई हिम्मत बोरसे, सुरेखा मुकेश पवार, विलास गोपा ब्राम्हणे, रत्नाबाई आप्पा पानपाटील, आशाबाई बापू पवार

भावनगर- (एकूण – 7 जागा)

आप्पा शिवाजी ठाकरे, सुमित्रा चंद्रभान ठाकरे, किरण उत्तम पालवी, सारिका सुनिल देशमुख, गणेश वामन ठाकरे, कविता एकनाथ गवळी, हिरुबाई संजय बहिरम

दसवेल- (7 पैकी 6 जागा बिनविरोध)

संदीप बाळासाहेब निकम, रितू किरण पवार, सुमनबाई सदाशिव पवार, ज्योती दिपक निकम, योगेश नानाजी पवार, दर्शना शांताराम सोनवणे, रामचंद्र काशिनाथ भामरे

भिलदर- (7 पैकी 5 बिनविरोध)

गोरख सुकदेव चौधरी, अनिता नामदेव बहिरम, रंजना विजय भोये, दत्तू रामा गायकवाड, बापू भावराव गावित, सोनाबाई गंगाराम पवार, मोहनाबाई मनीराम चौरे

बोरदैवत- (9 पैकी 3 बिनविरोध)

राजू शालन माळी, रवींद्र पंढरीनाथ पवार, रामदास देवराम माळीस, इंदूबाई नारायण चौधरी, अनिता काळू चौधरी, काळू सोमनाथ चौधरी, काळू धोंडू पवार, आक्काबाई काळू पवार, अनिता भगवान महाले

बुंधाटे- (9 पैकी 3 जागा बिनविरोध)

किशोर शांताराम बागुल, कैलास रामदास गायकवाड, मीना बबन गांगुर्डे, गुलाब नथु ठाकरे, वैशाली सोमनाथ ठाकरे, शोभा शंकर बहिरम, अनिता दिलीप चव्हाण, रंगनाथ गणपत सोनवणे, आशाबाई विलास गायकवाड

बोऱ्हाटे- (9 पैकी 2 जागा बिनविरोध)

धनजी हरी बर्डे, तात्या बाजीराव चौरे, माया शशिकांत बहिरम, शारदा नामदेव सूर्यवंशी, अर्चना पोपट सूर्यवंशी, दिलीप सोन्या सूर्यवंशी, राजू नंदलाल चौधरी, वैशाली लक्ष्मण सूर्यवंशी, सुवर्णा सुनिल बर्डे

यांची होती सर्वाधिक चर्चा…

  • अंतापूर येथील विजयी पॅनलचे नेते बंडू गवळी यांनी निवडणूकीत विजयश्री प्राप्त केल्याशिवाय दाढी काढणार नाही, असा निश्चय केला होता.

  • भावनगर ग्रामपंचायतीत सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम देशमुख यांच्या स्नुषा सारिका देशमुख केवळ एक मताने विजयी झाल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ मे २०२५ – ऑपरेशन सिंदूर

0
देशाने करून दाखवले अशीच भावना प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे. पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी घटनेनंतर सामान्य माणसांच्या मनात प्रचंड संताप होता, अजूनही आहे. तो या...