Friday, May 3, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जुलै 2020ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेच्या

- Advertisement -

अंतिम टप्प्यासाठी सुधारीत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने नगर जिल्ह्यातील स्थगित असलेल्या अनेक ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम देण्यात आला होता. पण राज्यात करोनाच्या संकटामुळे 17 मार्च 2020 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज (प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक) ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आयोगाने आदेशित केले होते.

परिणामी प्रभाग रचना अंतिम करण्याचा टप्पा स्थगित करण्यात आला होता. आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात येत आहेत. सदर बाब विचारात घेता प्रभाग रचनेच्या अंतिम टप्प्यासाठी सुधारीत कार्यक्रम देण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकार्‍यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2020 दिली आहे. तर जिल्हाधिकार्‍यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ मध्ये)व्यापक प्रसिध्दीची तारीख 2 नोव्हेंबर 2020 देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या