Wednesday, June 19, 2024
HomeनगरGrampanchayat Election : 178 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

Grampanchayat Election : 178 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी रविवारी, दि. 5 रोजी मतदान होत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्रे आहेत. तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात आहेत. आज सायंकाळपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होवून उद्या सोमवार, दि.6 रोजी निकालाची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे निघणार हे स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पद तर काही ठिकाणी सरपंच पदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे 178 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 6 लाख 34 हजार 321 मतदार मतदान करतील. रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळात मतदान होईल. सोमवारी (दि. 6) मतमोजणी होईल. मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्र आहे. तालुकानिहाय मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अकोले 22, संगमनेर 6, कोपरगाव 17, श्रीरामपूर 13, राहता 12, राहुरी 21, नेवासे 16, नगर 6, पारनेर 7 पाथर्डी 14, शेवगाव 27, कर्जत 6, जामखेड 3 व श्रीगोंदा 9 असून निवडणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आरक्षण आंदोलनात निवडणूक हरवली

यंदाची ग्रामपंचायत निवडणूक ही मराठा आरक्षण आंदोलनात हरवल्यात जमा होती. एककीकडे जिल्ह्यातील 174 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया आणि प्रचाराचा धुराळा उडालेला असतांना मराठा आरक्षणाचा मुद्द चांगलाच पेटला. यामुळे ग्रामीण भागात गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्याचा मतदानावर परिणाम होणार का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या