Thursday, February 5, 2026
HomeनगरSangamner : ग्रामपंचायतमधील गैरकारभाराबाबत जोर्वे ग्रामस्थ आक्रमक

Sangamner : ग्रामपंचायतमधील गैरकारभाराबाबत जोर्वे ग्रामस्थ आक्रमक

गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे सखोल चौकशीची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतमधील मासिक सभा व ग्रामसभा यांतील अनियमितता व एप्रिल 2022 ते मार्च 2025 मधील 15 व्या वित्त आयोगातून विविध कामांमध्ये वस्तू खरेदीत झालेल्या गैरकारभार या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीत तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबतचे निवेदनही दिले आहे. गटविकास अधिकार्‍यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच बादशाह बोरकर, सदस्य दिगंबर इंगळे, किसन खैरे, हौशीराम दिघे, संदीप काकड, संगीता थोरात, सुनीता दिघे, पूनम खैरे, मंगल काकड, जगन्नाथ दिघे, मुकेश काकड, बाबासाहेब बोरकर, सोपान कांदळकर, संजय थोरात, शेख हमीद, वसंत बोरकर, संतोष जाधव, कैलास इंगळे, सुनील थोरात, भाऊसाहेब दिघे, राहुल बोरकर, सुनील दिघे, भाऊराव बोरकर, विठ्ठल काकड, दत्तात्रेय काकड, रावसाहेब काकड, संपत थोरात, राजेंद्र बलसाने, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, प्रशांत गायकवाड, डॉ. प्रवीण काकड, रमेश दिघे, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, सत्यजीत थोरात, विठ्ठल काकड, दत्तू काकड आदी उपस्थित होते.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे, की जोर्वे ग्रामपंचायतीचा गैरकारभार व भ्रष्टाचार तक्रार आपले सरकारवर 14 एप्रिल 2025 रोजी केली असता ग्रामविकास अधिकार्‍यांनी उत्तरादाखल 25 एप्रिल, 2025 सर्व माहिती जोर्वे ग्रामपंचायतमध्ये अर्जदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे असा खुलासा केला. मात्र प्रत्यक्षात विचारणा केली असता कार्यालयीन कामकाज जास्त असल्याने 31 मे, 2025 नंतर माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, असे कळविले. सातत्याने दिलेल्या अर्जाचा दोन महिनेपेक्षा अधिकचा कालावधी होऊनही कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. सदस्यांनाही विचारलेल्या कामांची माहिती लेखी व तोंडी मागणी करूनही दिली गेली नाही. 30 मे 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांना दिशाभूल करणारी व चुकीची माहिती देवून ग्रामसभेची दिशाभूल केली. सन 2022/23 तत्कालीन उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी बाकडे खरेदी 4 लाख 13 हजार रुपये, मेडीक्लोर औषध खरेदी 2 लाख 43 हजार रुपये व औषध फवारणी आणि औषध खरेदी 1 लाख 96 हजार रुपयांची असा एकूण जवळपास 8 लाख 53 हजारांचा अपहार कागदोपत्री बोगस खरेदी बिले दाखवून केला असल्याचे म्हटले आहे.

YouTube video player

तसेच सन 2024/25 या आर्थिक वर्षात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा अपहार संगनमताने केला आहे. महिला सबलीकरणाच्या नावाखाली 4 लाख 12 हजार 560 रुपये शिलाई मशीन खरेदी केल्याचे दिसत आहे. पण ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारची खरेदी मासिक सभेत झाल्याची चर्चा नाही. लाभार्थी कोण आहेत, त्यांची निवड कशी व कधी केली याची कोणतीही माहिती सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दिली नाही. वरील सर्व माहिती मेरी पंचायत या संकेतस्थळावर पाहिल्यानंतर सदस्यांनी विचारणा करुनही कोणतीही माहिती मिळाली नाही. अशाचप्रकारे जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटूनही 14 फेब्रुवारी 2025 रोजी 2 लाख 99 हजार रुपये कचराकुंडी खरेदी केल्याचे आढळून आले आहे, त्यांचीही कागदोपत्री खरेदी दाखवून अपहार झाला आहे. त्याबाबत ग्रामसभेत विचारणा केली असता कचराकुंडी येणार आहे अशी निरर्थक उत्तरे दिली. नल-जलमित्र या नावाने 17 जानेवारी, 2025 रोजी 49 हजार पाचशे रुपये रक्कम ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या ऐवजी तिसर्‍या व्यक्तिच्या खात्यावर रक्कम वळती केलेली आहे.

सरपंच दोघेही पती-पत्नी हे पालकमंत्री विखे गटाचे आहे. ग्रामपंचातीच्या काराभाराची सखोल निःपक्षपातीपणे चौकशी झाल्यास हा आकडा 25 ते 30 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. वरील सर्वच बाबींची चौकशी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तातडीने होणे अपेक्षित आहे. वास्तविकपणे केलेल्या तक्रारीची चौकशी एक महिन्याच्या आत होणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीत झालेला अपहार व अनियमितता संदर्भात संबंधितांना राजकीय दबावापोटी पाठीशी घातले जाऊ नये. ग्रामस्थांना धमकाविण्याचे हाणामारी, दमदाटी, शिवीगाळ असे प्रकार सुरू असून कागदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा सात दिवसांच्या आत वरील गैरव्यवहाराची चौकशी न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पंचायत समिती संगमनेर जनआंदोलन करुन उपोषणास बसणार आहे, असा इशारा या निवेदनात दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...