Tuesday, October 22, 2024
Homeनगरग्रामपंचायतींना मिळणार 4 हजार नलजल मित्र

ग्रामपंचायतींना मिळणार 4 हजार नलजल मित्र

जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मोटर मेकॅनिक-फिटर व इलेक्ट्रिशियन-पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन कौशल्य संचाची नल-जल मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. नगर जिल्ह्यात 1 हजार 316 ग्रामपंचायती असून त्याठिकाणी प्रत्येकी 3 याप्रमाणे सुमारे 4 हजार नलजल मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी आपापल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्यरितीने होण्यासाठी प्रति ग्रामपंचायत 3 नल-जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर तिन्ही पदांकरिता प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत 9 उमेदवारांचे अर्ज ग्रामपंचायतीने पवर भरायचे आहेत. राज्यस्तरावर ग्रामपंचायतीने भरलेल्या अर्जांमधून उमेदवारांची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्लम्बर- गवंडी, मोटर मेकॅनिक-फिटर आणि इलेक्ट्रिशियन-पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील पूर्वाअनुभव असलेल्या व आवश्यक पात्रता धारण करणार्‍या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, यामुळे कौशल्ये असलेल्या उमेदवारांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाच्या या योजनेमुळे प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक याप्रमाणे अंतिम 3 पैकी 1 उमेदवारांची निवड होणार आहे. कुशल उमेदवारांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 316 ग्रामपंचायतींमध्ये नल-जल मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. यातील प्रत्येक ठिकाणी तीन याप्रमाणे 3 हजार 948 नलजल मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या