Wednesday, February 4, 2026
HomeनगरGramsevak Suicide : ग्रामसेवक बाचकर आत्महत्या अधिकाऱ्यांच्या जाचामुळे?

Gramsevak Suicide : ग्रामसेवक बाचकर आत्महत्या अधिकाऱ्यांच्या जाचामुळे?

करजगाव (वार्ताहर)

नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी व कोपरगाव तालुक्यात कार्यरत ग्रामसेवकाने केलेल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला असून आत्महत्येस कोपरगाव येथील दोघा अधिकाऱ्यांना जबाबदार धरल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, बाजीराव रखमाजी बाचकर यांचे पोटात विषारी औषध गेल्याने 8 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे उपचारा दरम्यान निधन झाले होते.
वरिष्ठांच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून विषारी औषध घेऊन जीवन संपविल्याचा आरोप बाचकर कुटुंबीयाने केला आहे. बाचकर हे कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.

YouTube video player

त्यांनी कोपरगाव येथिल पंचायत समितीच्या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केला. त्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या आशयाची चिठ्ठी मिळाली असल्याचे कुटुंबियाकडुन सांगण्यात आले आहे.

ती चिठ्ठी बाजीराव बाचकर यांचीच आहे का? याची खात्री व तपास सोनई पोलीस करत आहे. दरम्यान चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आली.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...