Sunday, June 14, 2026
HomeनगरBribery News : ग्रामसेविका व अभियंता लाचेच्या जाळ्यात

Bribery News : ग्रामसेविका व अभियंता लाचेच्या जाळ्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील कर्जुने खारे येथील ग्रामसेविका, तसेच अहिल्यानगर पंचायत समिती कार्यालयातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) यांच्यावर प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-2 मंजुरीसाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेविका पुष्पा डेरे व अभियंता गौतम सुर्यवंशी अशी त्यांची नावे असून सुर्यवंशी याला 10 हजार रूपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

- Advertisement -

महिला पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या वडिलांनी सन 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी नाव नोंदवले होते. सन 2024 मध्ये ऑनलाईन यादीत नाव आल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात 15 हजार रूपयांचे अनुदान जमा झाले. त्यानंतर टप्पा-2 मंजुरीसाठी ग्रामसेविका डेरे हिने 10 हजार रूपयांची लाच मागितली.
दरम्यान, घरकुल तपासणीसाठी आलेल्या अभियंता सूर्यवंशी याने देखील निधी मिळवून देण्यासाठी 10 हजार रूपयांची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार एसीबीने पडताळणी कारवाई केली असता, ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही संशयित आरोपींनी प्रत्येकी पाच हजार रूपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार हे ग्रामसेविका डेरे हिच्याकडे रक्कम देण्यासाठी गेले असता तिने ती रक्कम अभियंता सूर्यवंशी याच्याकडे देण्यास सांगितले. निमगाव घाना रस्ता, कर्जुने खारे येथे सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून 10 हजार रूपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...