Monday, May 27, 2024
Homeनाशिकदुर्गम भागातील विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध - खा. डॉ. श्रीकांत शिंदे

दुर्गम भागातील विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

सुरगाणा । प्रतिनिधी

गरीबाच्या घरातून आलेलो आहे. गरीबाच्या पोटी जन्म घेतलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळेच तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सुरगाणा येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्या प्रसंगी केले.

- Advertisement -

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, इंद्रजित गावित, सोनालीराजे पवार, भाऊसाहेब चौधरी, नगराध्यक्ष भरत वाघमारे, उपनगराध्यक्ष माधवी थोरात, हरिभाऊ भोये, मुख्याधिकारी सचिन पटेल, तुळशीदास पीठे,नगरसेवक सचिन आहेर, भगवान आहेर, अरुणा वाघमारे, पुष्पा वाघमारे, प्रमिला भोये, विजय कानडे आदी उपस्थित होते.

यावेळी खा.शिंदे म्हणाले की, यापुर्वीचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्य जनतेलाच काय पण आमदार खासदार यांना देखील भेटू शकत नव्हते. मात्र आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सामान्य माणसाला देखील वर्षा या निवासस्थानी भेटत असून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम करत आहेत. तालुक्यातील स्मशान भूमी, पाणी पुरवठा योजना, शेती सिंचन योजना, शासन आपल्या दारी, लेक लाडकी या योजना सरकारने यशस्वी पणे राबविल्या आहेत.

सर्वसामान्य माणसाचा कळवळा असल्याने आताचे मुख्यमंत्री शिंदे येणाऱ्या नागरिकांना भेटत असून त्यांच्या समस्या समजून सोडविल्या जात आहेत. दुर्गम भागातील समस्या, शाळा, व्यापारी संकुल, स्मशानभूमी, पाणी, आरोग्य, रस्ते, वीज इत्यादी विविध कामांसाठी शिंदे सरकार प्रयत्नशील असल्याचे खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

दुर्गम भागात एक जरी व्यक्ती असेल तरी सेवा पुरवली जाईल.पेठ तालुक्यातील कहांडोळपाडा येथे दमणगंगा नदीवर पूल नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पातेल्यात बसून जीव धोक्यात घालून नदी पार करून शाळेत जावे लागत असे. तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहताच क्षणी अकरा कोटी रुपये खर्च करून दमणगंगा नदीवर पूल उभारण्यात आला आहे. यामुळे तीस ते चाळीस गाव, वाडी, वस्ती चा संपर्क झाला आहे. यापुर्वीचे सरकार आदिवासी दुर्गम भागात कधीही पोहचले नाही. तेथे आमचे सरकार पोहोचले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी आदिवासी भागात आताचे सरकार पोहचून मुलभूत गरजा पूर्ण करीत आहे.

यावेळी सात वर्षापूर्वी मोहपाडा खुंटविहीर येथील सरपंच मोतीराम वाहूट यांचा पाण्याने भरलेले दोन हंडे खोल दरीतून डोक्यावर पाणी वाहून आणतांना वाटेतच मृत्यू झाला होता. त्याच दरीत मालगोंदा लघु पाटबंधारे सिंचन योजना पंचवीस ते तीस वर्षांपासून प्रस्तावित आहे. ती योजना तातडीने मंजूर करण्यात यावी असे निवेदन शेतकऱ्यांनी सादर केले. यावेळी रस्ता, आरोग्य, शिक्षण, पाझर तलाव आदी निवेदन सादर करण्यात आली. यावेळी धर्मेंद्र पगारीया, विश्रांती गायकवाड, मालतीबाई खांडवी, राजू बाबा, दिनेश वाघ, एकनाथ भोये, संतोष देशमुख, चिंतामण गायकवाड, विनायक गावित, सुनील गायकवाड, उत्तम वाघमारे, भास्कर चौधरी, प्रकाश वळवी आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या