बीड ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा झाली. जाहीर सभा सुरुहोण्या आगोदर अजित पवार यांचे बीड मध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले . कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी या सभेला उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज होत असलेली सभा ही कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही, तर उत्तरदायित्वाची सभा आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की , ”आम्ही राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. राजकारणात कोणी कायमचा वैरी आणि कायमचा मित्र नसतो. हे राजकारण आहे”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच “मराठवाडा ही संतांची भूमी आहे. बीड ही कष्टकरी बांधवांची भूमी आहे. आम्ही महापुरुषांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणारी माणसं आहोत. बीडची जनता ही राजकारण, समाजकारणाबाबत जाणकार आहोत” असं म्हणत अजित पवार यांनी बीडमधील जनतेचे कौतुक केलं.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
महाराष्ट्रातील सर्वाना सांगायचे आहे की, आम्ही महायुतीत असलो तरी सर्व जाती धर्माचे लोकांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाच्या असतात. 1 रुपयाच्या पीक विम्यामुळे अनेकांनी विमा उत्तरवला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 4500 कोटींचा बोजा आला मात्र आम्ही तो सहन करतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार.”, असा शब्द अजित पवार यांनी बीडमधील जाहीर सभेतून शेतकऱ्यांना दिला.
कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अनेकांचे फोन आले. विरोधक कायम काहीतरी चुकीची माहिती देतात. धनंजय मुंडे यांना दिल्लीला जायला सांगून धनंजय मुंडे यांनी जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती केली. अमित शाह यांनी तात्काळ 2 लाख मेट्रिक टन कांदा 24 रुपये प्रतिकिलो रुपयाने खरेदी केला.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा देखील निर्णय महायुतीच्या वेळी घेण्यात आला असून त्याचा फायदा सणा निमित्त राज्यातील जनतेला होणार असणार आहे असे त्यांनी सांगितले .
इतर लोक काय म्हणतात त्या कडे दुर्लक्ष करून आपल्याला काम करायचे आहे हा विषय लक्षात घेऊन आम्ही भाजपा सोबत गेलो यात आमचा काही स्वताचा स्वार्थ नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतात , सकारात्मक राजकारण हा माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे हे ही आपण लक्षात घ्यावे असे अजित पवार यांनी सांगितले.