Monday, June 24, 2024
Homeनगरधक्कादायक! शेतात पाणी भरायला गेलेल्या आजोबा-नातवाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

धक्कादायक! शेतात पाणी भरायला गेलेल्या आजोबा-नातवाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

शेवगाव | शहर प्रतिनिधि

- Advertisement -

रात्रीच्या वेळी कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या आजोबांसह नातवाचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वडूले खुर्द येथे घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

निवृत्ती टोपा आव्हाड (वय 78) व दीपक सोपान पाखरे (वय 26 ) असे मृत आजोबा व नातवाचे नाव आहे. वडूले खुर्द येथील कोपरे रस्त्यावरील वस्तीवर राहणारे शेतकरी निवृत्ती आव्हाड हे कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी वायरवर पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का बसला.

त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने नातू दीपक यास शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. त्यास वीज प्रवाहाची कल्पना आली नाही. त्याने आजोबांना उठविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत दीपक हा विवाहित असून त्याच्या मागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या