Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते उद्या ग्रेप पार्क रिसाॅर्टचे ई-उद्घाटन

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते उद्या ग्रेप पार्क रिसाॅर्टचे ई-उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला एक नवा आयाम देणार्‍या बहुप्रिक्षित एमटीडिसीच्या गंगापूर धरण येथील ग्रेप पार्क रिसोर्टचे रविवारी (दि.२७) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई उद्घाटन होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून ग्रेप पार्क रिसोर्ट उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरण येथे १४.४८ हेक्टरवर रिसोेर्ट बांधले आहे.

या ठिकाणी स्वागत व प्रतिक्षा गृह, तीन कक्ष असलेले चार ट्विन व्हिला, पर्यटकांसाठी २८ कक्ष व उपहार गृह, जलतरण तलाव व इतर सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

तसेच या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ११ बोट सुरु करण्यात येणार आहे. या सर्व कामांवर ७२ कोटी रुपये खर्च झाला आहे. धार्मिक शहर व वाईन कॅपिटल यासोबतच नाशिकमध्ये येणार्‍या पर्यटकांसाठी मनोरंजनासाठी हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

अनेक दिवसांपासून हा सोहळा लालफितीत अडकला होता. त्याचे ई उद्घाटन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्यास आॅनलाईनद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. तर पालकमंत्री भुजबळ हे प्रत्यक्ष सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या