Sunday, October 13, 2024
Homeमहाराष्ट्रकाय सांगता! पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट केलेली १ टन द्राक्षे अर्ध्या तासात...

काय सांगता! पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट केलेली १ टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब

पंढरपूर | pandharpur

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षभरात विविध सण आणि उत्सवांच्या दिवशी फळाफुलांनी आकर्षक सजावट केली जाते. त्याच पद्धतीने आज अमलकी एकादशीनिमित्त द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली हाेती.

- Advertisement -

काळ्या आणि हिरव्या द्राक्षामध्ये विठुरायाचे रूप अधिकच खुलले होते. ही द्राक्षे आज भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

पुणे आणि बारामतीच्या भाविकाने मंदिरात आरास केलेली एक टन द्राक्ष अर्ध्या तासात गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही द्राक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून नेल्याचा मंदिर समितीचे म्हणणे आहे.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज

तर काही भाविकांनी मंदिरातील कर्मचारी यांनीच द्राक्ष नेली असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे मंदिरातील द्राक्षे नेमकी भाविकांनी नेली की अन्य कोणी यायची जोरदार चर्चा पंढरपूरात सुरू आहे.

IND vs AUS 3rd Test : इंदोर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये

- Advertisment -

ताज्या बातम्या