Wednesday, November 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसमाजसेवा आणि राष्ट्रकल्याण कार्यात माहेश्वरी समाजाचे मोठे योगदान - लोकसभा अध्यक्ष ओम...

समाजसेवा आणि राष्ट्रकल्याण कार्यात माहेश्वरी समाजाचे मोठे योगदान – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

माहेश्वरी समाजाच्या इस्पितळ, शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

माहेश्वरी समाजाने नेहमीच सर्व समाज घटकांसाठी तसेच देशाच्या कल्याणासाठी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य आंदोलन काळात आणि त्यानंतर देशाच्या नवनिर्माणासाठी माहेश्वरी समाजाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामाजिक कल्याणामध्ये समाज नेहमीच पुढे असतो, त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांना चांगले शिक्षण व आरोग्य मिळावे, ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमाची सुविधा उपलब्ध व्हावी, गोरगरीब मुलांना वस्तीगृहाची सोय व्हावी, यासाठी नाशिक येथे श्रीकांत करावा फाउंडेशन च्या वतीने मोठे कार्य उभे राहत आहे, ही निश्चितच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा व डॉ.श्रीकांत करवा फाऊंडेशन आयोजित प्राथमिक शाळा, वृध्दाश्रम व इस्पितळ भूमिपूजन व ऋणनिर्देश सोहळा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवार दि. २२ रोजी जुना आडगाव नाक्या जवळील स्वामीनारायण बँक्वेट हॉल संपन्न झाला. या सदर कार्यक्रमास व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला, डॉ. श्रीकांत करवा, रामनिवास मानुधने,डॉ. संजय मालपाणी, प्रभावती मुंदडा, शोभना बुब, पुरुषोत्तम लोहिया,दिगंबर झंवर, सविता राठी,सुरेश केला,हिरालाल मालू,अशोक बंग,शरद राठी, शरद करवा रामेश्वर करवा,राजेश राठी,प्रकाश लढ्ढा, आशिष राठी,राजेश मालपाणी,पुरुषोत्तम हेडा, माणकचंद काबरा,विनोद जाजू,सतीश चरखा,जुगलकिशोर लोहिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ओम बिर्ला म्हणाले की, नाशिक ही भगवान रामाची भूमी आहे, या ठिकाणी सर्व जाती – धर्माचे आणि समाज – पंथाचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने राहत आहेत. माहेश्वरी समाज सर्व क्षेत्रात प्रगती करीत असताना सामाजिक कार्यात मोठे योगदान देत आहे, सर्वच समाजाच्या आर्थिक परिवर्तनासाठी देशभरात माहेश्वरी समाजाच्या वतीने चांगले कार्य करण्यात येत आहे. जसे भगवान महेश यांनी विष प्राशन करून सर्वांना अमृत दिले, तसे माहेश्वरी समाज देखील दुःख आणि कष्ट सहन करीत समाजाची सेवा करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही संतांची तसेच आध्यात्मिक भूमी असून या ठिकाणी हे राज्य प्रगती कडे वाटचाल करीत आहे, आपला देश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विश्वगुरू म्हणून कार्य करीत आहे, यापुढे देखील सर्व समाज घटकांनी भारत देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे, नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच ‘ बलिहारी बलिहारी जय महेश बलिहारी ‘ ही प्रार्थना म्हणण्यात आली. माहेश्वरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत करवा यांनी आपल्या मनोगतात कार्याची भूमिका मांडली. उमेश मुंदडा यांनी विविध देणगीदारांच्या नावे जाहीर करीत आभार व्यक्त केले. तसेच नाशिक जिल्हा माहेश्र्वरी महासभा आणि डॉ. श्रीकांत करवा फाऊंडेशन तर्फे नाशिक येथे सुमारे पंधरा एकर जागेत सुसज्ज शैक्षणिक संकुल,वृध्दाश्रम व इस्पितळाचे भूमिपूजन होत आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख उमेश मुंदडा यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश मुंदडा, सुरेश नावंदर,नयना हेडा, आशिष कलंत्री यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

‘महेश जीवन गौरव पुरस्कार’ स्व. प्रदीप बुब यांच्या वतीने त्यांच्या परिवाराने स्विकारला. तसेच महेश कर्मवीर पुरस्कार ज्येष्ठ सनदी लेखापाल अशोक झंवर(नाशिक), ब्रिजलाल बाहेती (मालेगाव), पुरुषोत्तम काबरा (येवला), प्रकाशचंद कलंत्री ( नांदगाव),रामकिसन करवा( सिन्नर) व नंदलाल भुतडा ( त्रंबकेश्वर) या जिल्ह्यातील सहा मान्यवरांना बिर्ला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या