Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदै. 'देशदूत' आयोजित 'पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पोला' शानदार सुरुवात

दै. ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पोला’ शानदार सुरुवात

पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो -२०२५’ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

एक्स्पोच्या माध्यमातून सामान्यांचे गृह स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे. नाशिक मनपा स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, नाशिक भाजप उपाध्यक्ष धनंजय माने, माजी नगरसेविका प्रियंका माने, नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वैभव शेटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला.

‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविक केले. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे आयोजन रामलीला बँक्वेट हॉल, जत्रा चौफुली, नांदूर नाका लिंक रोड, आडगाव शिवार पंचवटी येथे करण्यात आले आहे. त्यात पंचवटीच्या नवीन आडगाव नाका, जत्रा चौफुली, रासबिहारी रोड, कोणार्क नगर, बळी मंदिर, छत्रपती संभाजी नगर नाका परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे ३० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. तसेच स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला. प्रदर्शन रविवारपर्यंत (दि. 30) दुपारी 1 ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जाहिरात सहायक महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, समीर पाराशरे, आनंद कदम, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दै. ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी मानले.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पार्कसाईड, ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ए. सी जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कीस्टोन कन्स्ट्रक्शन, फोर्थ डायमेंशन प्रॉपर्टीज, दक्ष रिअल्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ग्रोवर्थ रिअल सोल्यूशन्स प्रा. लि., पुष्प्रीत रिअल्टी, सोमविजय कन्स्ट्रक्शन, ओंकारेश्वर इन्फ्राटेक, कनकलक्ष्मी डेव्हलपर्स, विहान ग्रुप बिल्डर – लँड डेव्हलपर, शेठ रिअल्टी, क्रिश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, समर्थ ग्रुप, सचिन पी. बागड इंजिनिअर्स-बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नेरकर प्रॉपर्टीज, आशापुरी कन्स्ट्रक्शन्स हे नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

पंचवटी विभाग हा अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला विभाग आहे. पंचवटीकडे व्यावसायिक दृष्ट्या सकारात्मक दृष्टीने बांधकाम व्यावसायिक बघत आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून सर्व स्तरातील ग्राहकांना घर व व्यावसायिक प्रकल्प घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्याचा निश्चितच ग्राहकांनी फायदा घ्यावा.
उद्धव निमसे

‘देशदूत’ने प्रदर्शनाचे आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले असून पंचवटी अनेक्स परिसरातील अनेक गृह व व्यावसायिक प्रकल्पांची माहिती याद्वारे ग्राहकांना निश्चितच मिळण्यास मदत होईल. नागरिकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
प्रियांका माने

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून, हक्काचे घर घेणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने उत्तमोत्तम आणि बजेटनुसार घर निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे. ‘देशदूत’च्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.
धनंजय माने

सद्यस्थितीत बांधकाम व्यवसायाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळण्यास प्रॉपर्टी एक्स्पोची भूमिका महत्त्वाची आहे. घर व त्यासंबंधीचे पूरक पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध असल्याने गृहस्वप्नपूर्तीची प्राथमिकता शक्य झाली आहे. ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
अ‍ॅड वैभव शेटे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...