नाशिक । प्रतिनिधी Nashik
उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित सुविक बिल्डकॉन प्रायोजित इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो 2025 प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
प्रमुख पाहुणे म्हणून नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे, नरेडको नाशिकचे संस्थापक सदस्य जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक सी. बी. सिंह, माजी सभागृहनेता तथा नगरसेवक सतीश (बापू )सोनवणे, माजी नगरसेविका डॉ. दिपाली कुलकर्णी, माजी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी आदी, सुविक बिल्डकॉनचे संचालक सुमित चौधरी व विक्रांत जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. रविवार (दि.२) पर्यंत तीन दिवसांत प्रदर्शनाचे आयोजन इंदिरानगर येथील संताजी संकुल, कलानगर सिग्नल, इंदिरानगर-पाथर्डी रोड, कोटक महिंद्रा बँकेजवळ करण्यात आले आहे. दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश आहे. घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनात नाशिक शहरातील त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे 30 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुविक बिल्डकॉन हे आहेत. फायनान्स पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी हे आहेत. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दै देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, ग्रामीण व्यवस्थापक सचिन कापडणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशरे, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी, तर देशदूतचे वार्ताहर किशोर चौधरी, यांनी आभार मानले.
इंदिरानगर परिसराची स्वतःची एक ओळख आहे. गेल्या काही वर्षात या भागाचा उत्तम विकास झाला आहे. या ठिकाणी अनेक साइट्स सुरू आहे. देशदूतच्या या उपक्रमामुळे अनेक चांगल्या प्रकल्पांची घर घेऊन इच्छिणाऱ्या ग्राहकांना एकाच छताखाली माहिती मिळण्यास मदत होणार आहे त्यामुळे हा उपक्रम नक्कीच स्तुत्य असा आहे.
-सुनील गवादे
मुंबई पुणे नंतर नाशिक या महत्वाच्या शहराची झपाट्याने वाढ होत आहे. सवलतीच्या दरात घर, दुकाने उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना याचा अजून जास्त फायदा होईल. स्वतःचे घर असावे हे सर्वांचे स्वप्न असते. हे साकार करण्यासाठी देशदूत ने आयोजित केलेल्या एक्स्पोमुळे मदत होणार आहे.
सी. बी. सिंह
ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये योग्य समन्वय साधला जाणार आहे. ग्राहकांना येथे एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध आहेत. देशदूतने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यायला हवा.
सतीश सोनवणे
अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून इंदिरानगर आणि परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. या परिसरात नाशिकच्या विकासकांनी विकसित केलेले प्रकल्प नाशिककरांनी आवर्जून बघायला यावे. देशदूतच्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.
जयेश ठक्कर
ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाहिले पाऊल टाकण्यात गहकांना नक्की मदत मिळेल असा विश्वास आहे.
-विक्रांत जाधव
एक ठराविक एरिया डोळ्यासमोर ठेऊन या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. येथे सहकुटुंब नागरिक हजेरी लावत आहे. ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सुमित चौधरी
नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
सुविक बिल्डकॉन, रोहन एंटरप्राइजेस प्रोमोटर्स अँड बिल्डर्स, रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्रिणीती रिअल्टर्स, डीएसजे ग्रुप, एलिका डेव्हलपर्स, पावा-क्रफ्टिंग अ परफेक्ट लाईफ, दक्ष रिअल्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, वास्तू बिल्डकॉन, आयएनडी डेव्हलपर्स, आशापुरी कन्स्ट्रक्शनस, एस अँड एस डेव्हलपर्स, श्रीकर कन्स्ट्रक्शन, वेदाज स्पेसेस, शेठ रियल्टी, जयप्रसाद कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर एलएलपी, सीडीआयएल फार्म प्लॉट, सिद्धिविनायक डेव्हलपर्स, सुर्या प्रॉपर्टीज्, बँक ऑफ महाराष्ट्र, पपायाज नर्सरी
फोटो गॅलारी




















